महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

FIR against Elvish Yadav : एल्विश यादवच्या नसानसात भरलंय 'विष'? तस्करी प्रकरणी पाच साथीदारांसह 9 विषारी साप ताब्यात

FIR against Elvish Yadav : बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्या विरोधात नोएडा येथील सेक्टर 49 पोलीस स्टेशनमध्ये विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीर रेव्ह पार्टी केल्याच्या आरोपाखाली एफआयर दाखल झालीय. त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यात असलेले 9 विषारी साप आणि विषही जप्त करण्यात आलंय. ताब्यात घेतलेल्या सापामध्ये कोब्रा जातीचे पाच साप, एक अजगर, दोन दुतोंडी साप आणि एका रॅट स्नेकचाही समावेश आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 1:02 PM IST

FIR against Elvish Yadav
एल्विश यादव विरोधात सापांची तस्करीची तक्रार

नई दिल्ली/नोएडा: FIR against Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्यांच्या मथळ्यामध्ये झळकतोय. उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील सेक्टर 49 पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीर रेव्ह पार्टी केल्याच्या आरोपाखाली एफआयर दाखल झालीय. ही तक्रार भाजपा खासदार मेनका गांधी यांच्या पीपल फॉर अ‍ॅनिमल या संस्थेसाठी कार्यरत अलेल्या गौरव गुप्ता यांनी दाखल केलीय. एल्विश यादववर आरोप करण्यात आलाय की, तो नोएडा आणि एनसीआरमधील फार्म हाऊसवर जिवंत सापांसोबत व्हिडिओ शूट करतो. रेव्ह पार्टीमध्ये या सापांच्या विषाचाही वापर होत असतो. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या ताब्यात असलेले 9 विषारी साप आणि विषही जप्त करण्यात आलंय. ताब्यात घेतलेल्या सापांमध्ये कोब्रा जातीचे पाच साप, एक अजगर, दोन दुतोंडी साप आणि एका रॅट स्नेकचाही समावेश आहे. एल्विश यादवचा कसून तपास पोलिसांनी सुरू केलाय.

एल्विश यादव विरोधात सापांची तस्करीची तक्रार

या प्रकरणी एल्विशसह सहा लोकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीपल फॉर अ‍ॅनिमल या एनजीओमध्ये कार्यरत असलेल्या गौरव गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की, एल्विश आणि त्याचे साथीदार नोएडा आणि एनसीआरमध्ये बेकायदेशीर रेव्ह पार्टीचं आयोजन करतात, अशी आम्हाला माहिती मिळाली होती. यामध्ये परदेशी मुलींना बोलवून स्नेक व्हेनम (सापाचे विष )आणि नशा देणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं जातं. या माहितीच्या आधारे आमच्याशी संबंधित व्यक्तीनं एल्विशशी संपर्क साधला आणि नोएडात रेव्ह पार्टी आणि कोब्रा व्हेनमसह अंमली पदार्थांची सोय करण्यास सांगितलं. एल्विशनं आमच्या माणसाला राहुल नावाच्या एजंटचा फोन नंबर दिला आणि आपलं नाव सांगून बोलणं करा, सगळी व्यवस्था होईल असं सांगितलं.

एल्विश यादव विरोधात सापांची तस्करीची तक्रार

तक्रारीत दाखल मजकुरानुसार एनजीओशी संबंधीत व्यक्तीनं एल्विशचं नाव घेऊन राहुल या रेव्ह पार्टीच्या एजंटशी बोलणं केलं. त्यानंतर तो पार्टीची व्यवस्था करण्यासाठी तयार झाला. त्यानंतर राहुलला नोएडा सेक्टर 51 येथील बँक्वेट हॉलमध्ये बोलवून घेतलं आणि याची सूचना पोलिसांना दिली. राहुल आणि इतर लोक तिथं ठरल्या प्रमाणे पोहोचले. ते लोक सोबत 9 साप आणि स्नेक व्हेनम घेऊन आले होते. तिथं पोहोचलेल्या पोलिसांनी सर्वांना अटक केली. एल्विश यादवसह सहा जणांवर वन्‍य जीव संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

एल्विश यादव विरोधात सापांची तस्करीची तक्रार

एल्विश यादव हा बिग बॉस ओटीटीचा विजेता असल्यानं लोकप्रियतेच्या कळसावर आहे. परंतु त्याचा हा नवा अवतार सर्वांना चकित करणारा आणि धक्कादायक आहे. त्याच्या बोलण्यात गोडवा दिसत असला तरी त्याच्या विचारांमध्ये विष भरलंय हे थक्क करणारं आहे. एल्विश हा अशा प्रकारे तरुणाईला विष पाजतोय ही घटना खळबळजनक आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details