महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Singham 3 vs Pushpa 2 : अजय देवगणची माघार? 'पुष्पा द रूल'साठी 'सिंघम ३' रिलीज लांबणीवर... वाचा काय आहे प्रकरण - Ajay Devgn upset

Singham 3 vs Pushpa 2: 'सिंघम 3'ची रिलीज डेट 15 ऑगस्ट आधीच लॉक केली असताना, 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी या आठवड्याच्या सुरूवातीला हीच तारीख रिलीजची निवडली आहे. त्यामुळं 'सिंघम 3' आणि 'पुष्पा 2'मध्ये बॉक्स ऑफिसवर संघर्ष होऊन नये म्हणून रोहित शेट्टी आणि अजय देवगणनं 'सिंघम 3'ची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला.

Singham 3 vs Pushpa 2
सिंघम 3 आणि पुष्पा 2

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 7:14 PM IST

मुंबई - Singham 3 vs Pushpa 2 : अल्लू अर्जुनला 'पुष्पा'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा 15 ऑगस्ट 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. तसंच निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांचा 'सिंघम 3' देखील यावेळीच रुपेरी पडद्यावर रिलीज होणार होता. मात्र आता 'पुष्पा 2' सोबत संघर्ष टाळण्यासाठी रोहित शेट्टीनं 'सिंघम 3'ची रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे. रोहित शेट्टीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 'पुष्पा' आणि 'सिंघम'चा सीक्वल दोन्ही ब्लॉकबस्टर होणार अशीच चिन्हे आहेत.

'सिंघम 3' आणि 'पुष्पा 2' :बॉलिवूडमधील अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. 'पुष्पा 2' आणि 'सिंघम 3' निर्मात्यांसाठी तणावाची बाब म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच तारखेला म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होते. 15 ऑगस्टला सुट्टी येत असल्यामुळं त्या दिवशी अनेक प्रेक्षक चित्रपट पाहायला जातील अशी अपेक्षा चित्रपट निर्माते करत आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंघम 3' चित्रपटाची घोषणा आधीच झाली होती. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ची घोषणा ही नंतर झाली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार अजय देवगण सध्या याप्रकरणामुळं खूप नाराज आहे.

अजय आणि रोहितनं केला निर्णय : 'पुष्पा' आणि 'सिंघम' हे दोघेही ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. अजय आणि रोहितला या 'डर्टी गेम'मध्ये पडायचे नाही. बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट राज्य करणार यावरून या दोन्ही चित्रपटांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही युजर्सचं म्हणणं आहे की, 'सिंघम 3'ने रिलीज डेट बदलावी. कारण यावेळी 'पुष्पा' पुन्हा राज्य करणार आहे'. तर एका यूजरनं लिहिलं की, 'मला अजूनही वाटतं की जर 'पुष्पा 2' आणि सिंघम 3 मध्ये संघर्ष झाला, तर 'सिंघम 3' सुरुवातीच्या दिवसातच 'पुष्पा 2'ला पराभूत करेल. कारण सिंघमची क्रेझ वेगळी आहे.' 'पुष्पा 2' अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Satinder Kumar Khosla Death : बिरबल हरपला, ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला काळाच्या पडद्याआड
  2. Happy birthday Prachi Desai : प्राची देसाईनं चित्रपटसृष्टीत कसं यश मिळवलं, जाणून घ्या तिचा आजवरचा प्रवास
  3. Haanji song out : भूमी पेडणेकर स्टारर 'थँक्स यू फॉर कमिंग'मधील पहिलं गाणं प्रदर्शित ; पहा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

...view details