मुंबई - SIIMA 2023 full winners list: साउथ इंडियन इंटरनेशनल मूवी अवार्ड्स (SIIMA) 2023 शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्युनियर एनटीआरला त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआर (RRR)साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर मृणाल ठाकूरला सीता रामम या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित ट्रॉफी मिळाली. तसेच तामिळ सिनेमात, विजेत्यांमध्ये आर माधवनचा याला रॉकेट्रीमधील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
'या' कलाकारांना मिळाला पुरस्कार :कमल हसनला 'विक्रम'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पॉप्युलर चॉईस पुरस्कार देण्यात आला. याशिवाय त्रिशाला 'पीएस 1'मधील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी पॉप्युलर चॉईस पुरस्कारानं सन्मानित केलं. लोकेश कनागराज यांना 'विक्रम'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला, आणि 'पोनियिन सेल्वन - 1'नं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मुकुट मिळाला. मल्याळम चित्रपट विजेत्यांमध्ये कल्याणी प्रियदर्शनला 'ब्रो डॅडी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय 'थल्लुमाला' चित्रपटासाठी टोविनो थॉमसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला.
SIIMA पुरस्कार 2023 तेलुगु विजेते
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता - आरआरआर (RRR)साठी ज्युनियर एनटीआर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - एसएस राजामौली आरआरआर (RRR)
सर्वोत्कृष्ट चित्रपट - सीता रामम
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - सीता राममसाठी मृणाल ठाकूर
तमिळ सिनेमातील SIIMA 2023 चे विजेते:
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता - प्रदीप रंगनाथन (लव्ह टुडे)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - अदिती (विरुमन)
लोकप्रिय निवड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - त्रिशा (PS1)
लोकप्रिय निवड सर्वोत्कृष्ट अभिनेता - कमल हासन (विक्रम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक - कीर्ती सुरेश (सानी कायधाम)
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता - माधवन (रॉकेटरी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अनिरुद्ध रविचंदर (विक्रम)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - माधवन (रॉकेटरी)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - योगी बाबू (लव्ह टुडे)
सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेतील अभिनेता - एसजे सूर्या (डॉन)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष) - काली व्यंकट (गार्गी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (महिला) - वासंती (विक्रम)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर - थोटा थरानी (PS1)
सर्वोत्कृष्ट गीतकार - इलांगो कृष्णन (पोन्नी नधी)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - रवि वर्मन (PS1)
अचिव्हमेंट अवॉर्ड - मणिरत्नम