महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Yodha New Release Date : सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा'चं प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर - योद्धा नवीन रिलीज डेट

Yodha New Release Date : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या 'योद्धा' चित्रपटामुळं चर्चेत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली आहे. 'योद्धा'मध्ये सिद्धार्थ हा एका सैनिकाच्या भूमिकेत दिसेल.

Yodha New Release Date
योद्धा नवीन रिलीज डेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 1:12 PM IST

मुंबई - Yodha New Release Date : 'शेरशाह'नंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा मोठ्या पडद्यावर 'योद्धा' चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं निर्मित केलेल्या या चित्रपटात दिशा पटानी आणि राशी खन्ना पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करताना दिसतील. 'योद्धा' चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर अंबरे आणि पुष्कर ओझा यांनी केलंय. काही दिवसापूर्वी सिद्धार्थ मल्होत्राचे दोन लूक प्रदर्शित करण्यासोबतच, निर्मात्यांनी चाहत्यांना 'योद्धा'बद्दल माहिती दिली होती की, चित्रपटाची रिलीज डेट वाढवण्यात आलीय.

'योद्धा' चित्रपटाला मिळाली नवीन रिलीज डेट :सिद्धार्थ मल्होत्राचा बहुप्रतीक्षित 'योद्धा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत पुन्हा एकदा बदल झाला आहे. यापूर्वी 'योद्धा' 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. त्याआधीही हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज होता, मात्र त्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट 8 डिसेंबर 2023 ठेवण्यात आली होती. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपट 'मेरी ख्रिसमस' 8 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे, त्यामुळं या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळाली असती, मात्र आता रिलीज डेट बदलण्यात आली आहे. करण जोहरनं पुन्हा एकदा 'योद्धा' चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करत लिहलं, 'आम्ही आकाशात उडण्याची तयारी केली आहे, योद्धा 15 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहात येत आहे'.

योद्धा चित्रपटाबद्दल :'योद्धा'चा निर्माता करण जोहर आहे. आता सिद्धार्थच्या चाहत्यांना या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा ​​'योद्धा'मध्ये एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना आणि विमानातील प्रवाशांना वाचवताना दिसणार आहे. रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' आणि विकी कौशलचा 'सॅम बहादूर' चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका होणार आहे.

हेही वाचा :

  1. Rashmika Mandanna Deepfake Video: 'मला सुरक्षित वाटते', बिग बीनं पाठिंबा दिल्याबद्दल रश्मिकानं मानलं आभार
  2. Sam Bahadur: विकी कौशल, मेघना गुलजार आणि सान्या मल्होत्रा 'सॅम बहादूर' ट्रेलर लॉन्चसाठी दिल्लीत दाखल
  3. Bigg Boss 17 day 23 : नॉमिनेशननंतर बिग बॉसच्या घरात अशांतता, मुनावरनं दाखवला मन्नाराबद्दलचा हळवा कोपरा

ABOUT THE AUTHOR

...view details