मुंबई :बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 6 फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. त्यांच्या लग्नाला चित्रपट क्षेत्रातील पाहुण्यांसह सुमारे 150 व्हीव्हीआयपी गेस्ट लग्नाला उपस्थित राहणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थ आज जैसलमेरला पोहोचले आहेत.
व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास व्यवस्था : सूर्यगढ हॉटेलमध्ये लग्नाची तयारी सुरू झाली आहे. लग्नाला आमंत्रित करण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, मुंबईतील वेडिंग प्लॅनर कंपनी ही सर्व व्यवस्था पाहत आहे. सूर्यगड हॉटेल जैसलमेरपासून 16 किमी अंतरावर आहे. डिसेंबर 2010 मध्ये जयपूरच्या एका व्यावसायिकाने हे हॉटेल बनवले होते. सुमारे 65 एकर परिसरात पसरलेले हे हॉटेल जैसलमेरच्या पिवळ्या दगडांनी बनवलेले आहे. हे हॉटेल डेस्टिनेशन वेडिंगसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
हे पाहुणे लग्नाला हजेरी लावणार :सिद्धार्थआणिकियाराच्यालग्नालाफॅशन डिजायनरमनीष मल्होत्रा, दिग्दर्शक करण जोहर, रोहित शेट्टी, अभिनेत्री ईशा अंबानी, दाक्षिणात्य अभिनेता रामचरण, बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, वरुण धवन, विकी कौशल, कतरिना कैफ इत्यादी स्टार्स पोहचणार आहेत. या दोघांच्या लग्नाला अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे देखील उपस्थित राहणार आहेत.