महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sid Kiara Mumbai Reception : सिद्धार्थ - कियाराचं रिसेप्शन कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती - सिद्धार्थ कियारा मुंबई रिसेप्शन

दिल्लीत लग्नाचे ग्रॅंड रिसेप्शन दिल्यानंतर सिद्धार्थ-कियारा आता मुंबईत बॉलिवूड स्टार्सना रिसेप्शन देणार आहेत. या रिसेप्शनचे इनविटेशन कार्ड लीक झाले असून रिसेप्शनची तारीख आणि ठिकाणही उघड झाले आहे.

Sid Kiara Mumbai Reception
सिद्धार्थ - कियाराचं रिसेप्शन

By

Published : Feb 11, 2023, 1:02 PM IST

मुंबई : बॉलिवूडचे गोंडस जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रवेश केला आहे. ७ फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हे जोडपे विवाह बंधनात अडकले. यानंतर या जोडप्याने दिल्लीत नातेवाईक आणि खास मित्रांना लग्नाचे रिसेप्शन दिले होते. आता हे जोडपे बॉलिवूड स्टार्सला लग्नाचे रिसेप्शन देण्यासाठी तयार आहे. सिध्दार्थ-कियारा यांच्या मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिसेप्शनची तारीख आणि ठिकाणही या कार्डमध्ये उघड करण्यात आले आहे.

रिसेप्शन कधी आणि कुठे होणार? :सिद्धार्थ-कियारा यांच्या मुंबई रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल रिसेप्शन इनव्हिटेशन कार्डनुसार, सिद्धार्थ-कियारा यांचे रिसेप्शन मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये होणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता भव्य रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनच्या बहाण्याने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी एकाच छताखाली दिसणार आहेत.

रिसेप्शनमध्ये येणारे स्टार गेस्ट : बॉलिवूड चित्रपट निर्माते करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, जुही चावला आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी जैसलमेरला पोहोचले होते. आता या पाहुण्यांसोबत बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटीही लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावणार आहेत. यामध्ये शाहरुख खान, अजय देवगण आणि सलमान खान सह अनेक स्टार्स येण्याची शक्यता आहे. पण अद्याप या जोडप्याने याची पुष्टी केलेली नाही.

दिल्लीत ग्रॅंड रिसेप्शन दिले : नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी गुरुवारी रात्री दिल्लीत ग्रॅंड रिसेप्शन दिले. सिद्धार्थने दिल्लीत राहणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांसाठी हे रिसेप्शन आयोजित केले होते. लग्नानंतर एका दिवसाने सिद्धार्थ-कियारा पती-पत्नीच्या रुपात जैसलमेर विमानतळावर स्पॉट झाले. त्यानंतर ते कडेकोट बंदोबस्तात दिल्लीच्या 'द लीला पॅलेस'मध्ये पोहोचले. या वेळी हे जोडपे मीडियापासून अंतर राखताना दिसले. त्यावेळची त्यांची एक झलक कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गेल्या शुक्रवारी या जोडप्याने त्यांचा जयमालाचा सुंदर आणि रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये हे जोडपे रोमँटिक अंदाजात वरमालाचा सोहळा पूर्ण करताना दिसले. जयमालाचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हेही वाचा :Siddharth and Kiara after marriage: सिद्धार्थ कियाराने ढोल ताशाच्या गजरात केला धमाकेदार गृहप्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details