मुंबई :दिल्लीत भव्य रिसेप्शन आयोजित केल्यानंतर, नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी शनिवारी मुंबईत पोहोचले. मुंबईतील कलिना एअरपोर्टवर कपल स्पॉट झाले. रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-कियारा आज (12 फेब्रुवारी रोजी) मुंबईत दुसरे ग्रँड रिसेप्शन आयोजित करणार आहेत, ज्यामध्ये इंडस्ट्रीतील लोक उपस्थित असतील. त्याचवेळी पापाराझींनी सिद्धार्थ आणि कियाराच्या मुंबईतील नवीन घराचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिद्धार्थ आणि कियाराचे नवीन घर :व्हायरल व्हिडिओनुसार, ही तीच इमारत आहे ज्यामध्ये सिद्धार्थ आणि कियारा यांचे नवीन अपार्टमेंट आहे. या व्हिडिओमध्ये पापाराझी एका माणसाला विचारतात की, सिद्धार्थ आणि कियाराने हे घर कधी खरेदी केले? ज्याला ती व्यक्ती उत्तर देते, 'एक आठवडा झाला.' सिद्धार्थ आणि कियारा यांनी मुंबईतील नायर हाऊस अपार्टमेंटमध्ये त्यांचे नवीन घर घेतले आहे, जिथे ते त्यांचे नवीन आयुष्य सुरू करणार आहेत.
रिसेप्शनमध्ये येणारे स्टार गेस्ट : सिद्धार्थ आणि कियारा 12 फेब्रुवारी 2023 (रविवार) रोजी त्यांच्या बॉलिवूड मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करतील, ज्यामध्ये सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, भूषण कुमार, मीरा राजपूत, शाहिद कपूर, करण जोहरसह इतर चित्रपटातील कलाकार दिसणार आहेत. कियारा-सिद्धार्थ त्यांच्या मुंबईतील घराबाहेर पापाराझींना भेटले आणि त्यांना मिठाईचे बॉक्स दिले. यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा पांढऱ्या कुर्ता-पायजामामध्ये खूपच सुंदर दिसत होता. दुसरीकडे, कियारा पिवळ्या रंगाच्या अनारकलीत खूपच सुंदर दिसत होती. नववधूने सिंदूर आणि मंगळसूत्रही परिधान केले होते. नवविवाहित जोडप्याने पापाराझींसाठी पोज दिली आणि फोटोही काढले.