जैसलमेर (राजस्थान) : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आज जैसलमेरमधील सूर्यगढ हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर या लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी जैसलमेरला पोहोचले आहेत. यामध्ये मुख्यतः जुही चावला, तिचा पती जय मेहता, करण जोहर, शाहिद कपूर आणि इतरांचा समावेश आहे. कियारा अडवाणीची बालपणीची मैत्रिण आणि मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी रविवारी सूर्यगढ हॉटेलमध्ये काही काळासाठी आली होती, त्यानंतर ती परतली.
सिद्धार्थ आणि कियाराचा जोरदार डान्स : मेहंदी सोहळ्यानंतर सोमवारी भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये पाहुण्यांसह कुटुंबातील सदस्यांनी जोरदार डान्स केला. या दरम्यान वर सिद्धार्थ मल्होत्रा आणि वधू कियारा अडवाणी यांनीही परफॉर्मन्स दिला. यासोबतच दोघांचे कुटुंबीयही लग्नाच्या गाण्यांवर जोरदार नाचताना दिसले. कॉन्सर्टच्या प्लेलिस्टमध्ये काला चष्मा, नचदे ने सारे, जुग जुग जिओ, रंगी सारी गुलाबी चुनरिया, डिस्को दिवानी आणि इतर अनेक गाण्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
यांनीही दिला परफॉर्मन्स : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल सूर्यगढमधील लग्नाच्या मैफिलीत वधू-वरांव्यतिरिक्त, लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या दोन्ही पाहुण्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही डीजे गणेशच्या तालावर जबरदस्त डान्स केला. ज्यामध्ये मुख्यतः शाहिद, मीरा, करण जोहर आणि जुही चावला यांचा समावेश होता. या सोबतच खासकरून बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा भाऊ मिशाल अडवाणीनेही आपल्या बहिणीसाठी कॉन्सर्टमध्ये खास डान्स केला. विशेष म्हणजे कियाराचा भाऊ मिशाल अडवाणी हा स्वतः एक रॅपर संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहे.
नो फोन पॉलिसी : सिद्धार्थ-कियारा यांनी त्यांच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये 'नो फोन पॉलिसी'ची घोषणा केली आहे. या जोडप्याने त्यांच्या पाहुण्यांना आणि हॉटेल कर्मचार्यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करू नका असे सांगितले आहे. सिद्धार्थ आणि कियारा स्वत: लग्नाचे पहिले फोटो पोस्ट करणार आहेत. कोणीही सेलेब्रिटी सूर्यगढ पॅलेसमध्ये दाखल झाल्यावर त्यांचे पारंपरिक राजस्थानी पद्धतीने स्वागत करण्यात येते. त्यानंतर स्थानिक लोकगीतांसह लोककलाकारही आपले परफॉर्मन्स सादर करतात. रात्री सोन्यासारखा चमकणारा सूर्यगढ पॅलेस हा भारतातील टॉप वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाला जवळपास 100 ते 150 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :Angad Bedi Birthday: लग्नापूर्वी ७५ मुलींना डेट करत होता अंगद बेदी, वाढदिवसानिमित्त वाचा त्याच्या अनोख्या गोष्टी