मुंबई :अभिनेता सिद्धार्थ हा प्रसारमाध्यमांसोबत फार मोजके बोलतो. सामान्यपणे तो सार्वजनिक मंचांवरही बोलणे टाळत असतो. मात्र सध्याला सिद्धार्थचा श्रावाणानंदच्या लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या लग्नात सिद्धार्थने स्टेजवर जाऊन ओये ओये हे गाणे गाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. यावेळी तो लग्नाच्या मंचावर संगीत बँडमध्ये सामील झाला. त्यानंतर त्याने ओये ओये गायले. या गाण्यामुळे त्यानी तेथील असणाऱ्या लोकांचे मने जिंकून घेतली आहे. सिद्धार्थचा श्रावाणानंदच्या लग्नातील हा व्हिडिओ सोशल मीडियालर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या व्हिडिओवर फार लाईक आणि कमेंट येत आहे.
व्हिडिओ झाला व्हायरल :सिद्धार्थ या व्हिडिओत त्याच्या 2009 च्या तेलगू चित्रपटातील ओये ओये गाण्यासाठी स्टेजवर बँडमध्ये सामील होताना दिसत आहे. या सिद्धार्थला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाताना दिसत आहे. शिवाय अनेकजण या गाण्यासाठी शिट्ट्या वाजवताना दिसत आहे. या कार्यक्रमात सिद्धार्थने काळ्या पँटसह पांढरा टक्सिडो परिधान केला आहे. या व्हिडिओला बघून काही सोशल मीडिया या वापरकर्त्याने लिहिले, 'त्याच्या मूळ स्केलच्या खाली. त्याची स्केल थोडा जास्त आहे. मल्टी-टॅलेंटेड!' दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, 'मल्टी-टॅलेंटेड (ताली इमोजीसह).' गेल्या वर्षी तेलुगू चित्रपट महा समुद्रममध्ये एकत्र काम केल्यानंतर सिद्धार्थ आणि श्रावाणानंद चांगले मित्र झाले. सिद्धार्थने अनेक तेलगू आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याची फॅनफोलोविंग फार जास्त प्रमाणात आहे. शिवाय त्याचा हिंदी चित्रपटामधील रंग दे बसंतीमधील रोल हा त्याच्या चाहत्यांना फार पसंतीला पडला होता.