महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Siddharth Anand interview Part 2 : 'पठाण'च्या यशाने विरोधकांचा डाव हाणून पडला, सिद्धार्थ आनंद यांनी मुलाखतीत दिली माहिती - सिद्धार्थ आनंद यांनी मुलाखतीत दिली माहिती

'पठाण'च्या यशाने चित्रपटाची संपूर्ण टीम खूप आनंदीत आहे. तसेच, चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचा निर्माता सिद्धार्थ आनंद यांनी एका मुलाखतीत चांगलाच समाचार घेतला. त्यांनी एका मुलाखती सांगितले की, 'पठाण' यशस्वी झाल्याने विरोधकांचा डाव फसला आहे. तसेच, 'बॉयकॉट पठाण' चालवणाऱ्यांना आता चांगलीच चपराक बसली आहे.

Siddharth Anand interview Part 2: Pathaan failed boycott gang agenda - video
'पठाण'च्या यशाने विरोधकांचा डाव हाणून पडला, सिद्धार्थ आनंद यांनी मुलाखतीत दिली माहिती

By

Published : Feb 4, 2023, 6:29 PM IST

'पठाण'च्या यशाने विरोधकांचा डाव हाणून पडला, सिद्धार्थ आनंद यांनी मुलाखतीत दिली माहिती

हैद्राबाद :'पठाण'च्या व्यावसायिक यशाने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या खांद्यावरचे मोठे ओझे कमी झाले आहे. चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंद यांनी सांगितले की, पठाणच्या रिलीजपूर्वी तो विविध कारणांमुळे तणावाखाली होता. कारण, पठाणच्या रिलीजच्या दोन महिने आधी शाहरुख खानच्या स्टारडमचा मोठा फटका बसला होता. एका चित्रपटात SRK दिग्दर्शित करणे आणि जगभरातील सुपरस्टारच्या विशाल चाहत्यांना खूश करू शकेल, असा यशस्वी चित्रपट देणे हे किती मोठे काम आहे, हे त्याच्या लक्षात आले आहे.

'बेशरम रंग' गाणे रिलीज झाल्यानंतर चित्रपट वादात :'बेशरम रंग' गाणे रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादात सापडला होता. यानंतर सोशल मीडियावर 'बॉयकॉट पठाण' आणि बॉलीवूडचा बहिष्कार दिवसेंदिवस ट्रेंड बनत चालला होता. पहिल्या दिवशी बॉक्सऑफिस ओपनिंग आणि त्यानंतरच्या दिवसांचा व्यवसाय मात्र बहिष्कार गँगला मागे टाकत 'पठाण'ने मोठी झेप घेतली. त्यावर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ म्हणाला पठाण बहिष्काराचा अजेंडा अयशस्वी ठरला.

चाहत्यांनी-प्रेक्षकांनी विरोधकांचा डाव हाणून पाडला :चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंदने सांगितले की, त्याला माहिती आहे की, चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही. परंतु, चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी प्रचंड बदनामी करीत, 'बॉयकॉट पठाण' हा ट्रेंड चालवला. यामुळे मी खूप तणावाखाली होतो. परंतु, चाहत्यांनी-प्रेक्षकांनी विरोधकांचा डाव हाणून पाडला, त्यांनी तसे काही केले नाही. नंतर, जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला मोठे यश मिळवून दिले आणि बहिष्कार संघाचा अजेंडा अयशस्वी ठरवला. 'पठाण'वर बहिष्कार टाकू इच्छिणाऱ्यांनी चित्रपट पाहण्याची विनंतीही सिद्धार्थने केली आहे.

'पठाण'ने केले अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड ब्रेक केले :शाहरुख खानने पुन्हा एकदा आपणच बॉलिवूडचा खरा 'बादशाह' असल्याचे सिद्ध केले आहे. होय, शाहरुखच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली होती. 'पठाण'ने दोन दिवसांत इतकी कमाई केली की, त्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्व रेकॉर्ड मोडले. जगभरातील मोठ्या ओपनिंगनंतर पठाणने दोन दिवसांच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 26 जानेवारीच्या रात्रीपर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'पठाण'ची रेकाॅर्डब्रेक कमाई :बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या 'पठाण' या चित्रपटाने शाहरुख खानने आपले स्टारडम अजूनही जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठाण या चित्रपटाने 5 दिवसांत जगभरात 500 कोटींचा आकडा सहज पार केला आहे. देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहे प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेली असतात. 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर कमाईची सुनामी आणली आहे. थिएटरमध्ये 'पठाण'च्या आसपास एकही चित्रपट टिकत नाही.

पाचव्या दिवशीही अद्भूत कलेक्शन :बॉक्स ऑफिसवर 55 कोटींची ओपनिंग केलेल्या 'पठाण' चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत जगभरात 550 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने यापूर्वी 4 दिवसांत 400 कोटींची कमाई केली होती. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाने पाचव्या दिवशी 65 कोटींचा करिश्माई कलेक्शन केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details