महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sid-Kiara's Mumbai reception: सिद्धार्थ कियाराचे मुंबई रिसेप्शन कधी, कुठे, पाहुण्यांची यादी आणि इतर माहितीसाठी वाचा - सिद्धार्थ आणि कियारा

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या जोडप्याने 9 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या लीला पॅलेसमध्ये वराच्या कुटुंबासाठी त्यांचे पहिले रिसेप्शन आयोजित केले होते. या दोघांचे दुसरे रिसेप्शन 12 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या सेंट रेगिस हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नानंतरचा भव्य कार्यक्रम रात्री 8:30 पासून सुरू होईल.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 11, 2023, 9:55 AM IST

मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी जैसलमेरमध्ये एका जिव्हाळ्याच्या समारंभात लग्न केले होते. यावेळी बॉलिवूडमधील मोजके सेलेब्रिटी या लग्नाला हजर होते. फिल्म इंडस्ट्रीतील तमाम सहकाऱ्यांना लग्नानंतरच्या समारंभात एकत्र करण्यासाठी मुंबईत रिसेप्शन कार्यक्रम घेण्याचे सिद्धार्थ आणि कियाराने ठरवले आहे.

जैसलमेरच्या सुर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा लग्नाचा शाही सोहळा पार पडला होता. या जोडप्याने हिंदू परंपरेनुसार लग्न केले. दिल्लीतील प्रसिद्ध 'जीआ' वेडिंग बँड मंगळवारी कार्यक्रमस्थळी दाखल झाला होता. पारंपरिक 'घोडी'वर सिद्धार्थने लग्नात शाही एन्ट्री केली. आदल्या दिवशी, लग्नाच्या ठिकाणाहून अनेक व्हिज्युअल व्हायरल झाले होते ज्यात पारंपारिक गुलाबी पोशाखातील काही पुरुष पुष्पहार धारण करताना दिसत होते. या विवाहाला हाय प्रोफाईल गेस्ट निमंत्रीत होते. भारतात सर्वत्र चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला हा विवाह पार पडल्यानंतर नव दांपत्य दिल्लीला रवाना झाले. ही जोडी विमानतळावर प्रवेश करताना व बाहेर पडताना पापाराझींच्या मोठ्या गर्दीने त्यांचे स्वागत केले होते. आता विवाहानंतर हे जोडपे पहिल्यांदाच मुंबईत रिसेप्शनच्या निमित्ताने येणार आहे. इथे नवविवाहित जोडपे त्यांच्या फिल्मी कुटुंबासाठी भव्य रिसेप्शन देईल.

सिद्धार्थ आणि कियारा शनिवारी दुसऱ्या रिसेप्शनसाठी मुंबईला जाणार आहेत ज्यात बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती दिसेल. या जोडप्याने 9 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या लीला पॅलेसमध्ये वराच्या कुटुंबासाठी त्यांचे पहिले रिसेप्शन आयोजित केले होते. या दोघांचे दुसरे रिसेप्शन 12 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या सेंट रेगिस हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नानंतरचा भव्य कार्यक्रम रात्री 8:30 पासून सुरू होईल. विशेष म्हणजे या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका ऑनलाइन लीक झाली आहे. कार्डमध्ये सिद्धार्थ आणि कियारा यांचा त्यांच्या लग्नातील हसतमुख फोटो आहे. त्यात तारीख, वेळ आणि ठिकाण यासारख्या तपशीलांचा उल्लेख आहे.

रिसेप्शनला अनेक बॉलीवूड तारे आणि उद्योगपती उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने हा एक भव्य कार्यक्रम असणार आहे. करण जोहर, शाहिद कपूर, मनीष मल्होत्रा, शाहरुख खान, वरुण धवन, अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, जुही चावला, अनिल कपूर, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ आणि कियारा लग्नाच्या आधी दोन वर्षे डेट करत होते. मात्र, ते नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल कधीही वाच्यता करत नव्हते. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे उघडपणे प्रेमात पडले होते. (ANI)

हेही वाचा -Tanisha Santoshi Exclusive : अभिनेत्री तनिषा संतोषीचे 'गांधी गोडसे'तून पदार्पण, ईटीव्ही भारतशी संवाद, म्हणाली 'चित्रपटात वादग्रस्त...'

ABOUT THE AUTHOR

...view details