मुंबई :'कौन प्रवीण तांबे', 'इक्बाल', 'ओम शांती ओम' आणि 'गोलमाल' फ्रँचायझी मधील त्याच्या कामासाठी ओळखला जाणारा बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदे, याने नाइन रसा या यूट्यूब चॅनलवर एक खुलासा केला आहे. की त्याला फार कमी वेळा लीड रोल मिळाले आहे. त्याला दुसरी चॉईस म्हणून ठेवले जाते असे त्याने सांगितले आहे. या मुलाखतीत त्याने सांगितले की, काही कलाकाराने भूमिका नाकारल्याने त्याला अनेकदा त्यांच्याद्वारे चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. यासाठी त्याने त्या कलाकाराचे आभार देखील यावेळी मानले आहे. या मुलाखतीत त्याने म्हटले की, मला या संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे, आणि मला वाटत नाही की मी पहिली निवड कोणाची असतो. हे महत्त्वाचे आहे. जर माझ्या नशिबात ते लिहिलेले असेल तर ते माझ्याकडे येणे निश्चित आहे आणि मी हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे'. यावेळी त्याने असे म्हटले.
चॅट शो : अलीकडेच एका चॅट शोमध्ये, श्रेयसने कार्यक्रमाच्या होस्टला त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितले जेव्हा त्याला काम मिळत नव्हते. एका टीव्ही शोच्या कॅमेरामनने एकदा त्याला 'पनौती' असे संबोधले होते. श्रेयस पुढे सांगितले, मी एका टीव्ही शोच्या ऑडिशनला गेलो होतो, आणि काही कारणास्तव कॅमेरा काम करत नव्हता. मी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला अडवले. अर्धा तास त्यांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काहीही बदलले नाही. नंतर, कॅमेरामनने मला सांगितले, 'अरे तू तो पनौती है रे' आणि मला वाईट वाटले. त्यावेळेस माझ्याकडे काही काम नव्हते. श्रेयसच्या या खुलाशाने प्रेक्षकांना फार धक्का बसला होता.