महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्रेयस तळपदेच्या तब्येतीत सुधार; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता - हृदयविकाराचा झटका

Shreyas Talpade Health : अभिनेता श्रेयस तळपदेला गुरूवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान त्याला डिस्चार्ज कधी मिळणार हे श्रेयसचा मित्र आणि चित्रपट निर्माता सोहम शाहनं सांगितलं आहे.

Shreyas Talpade Health
श्रेयस तळपदे आरोग्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 12:54 PM IST

Updated : Dec 17, 2023, 2:31 PM IST

मुंबई : Shreyas Talpade Health : अभिनेता श्रेयस तळपदेला त्याच्या आगामी 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या शूटिंगनंतर गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला तात्काळ बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी केली. दरम्यान श्रेयस तळपदेची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रेयसचा मित्र आणि चित्रपट निर्माता सोहम शाह सांगितलं की, तो आता बरा होत आहे. सोहम शाहनं श्रेयसच्या डिस्चार्जबद्दल माहिती शेअर केली आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेला रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार? : श्रेयस तळपदेचा जवळचा मित्र सोहम शाहनं त्याच्या तब्येतीची माहिती देत सांगितले की, 'मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्याच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी त्याला डिस्चार्ज मिळेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आज सकाळी तो आमच्याकडे पाहून हसला. आम्हा सर्वांसाठी हा दिलासा होता. याशिवाय सोहमनं श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदेचं कौतुक करत म्हटलं, 'मी दीप्तीचं मनापासून आभार मानू इच्छितो की, तिनं योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उशीर न करता रुग्णालयात दाखल करणं खूप आव्हानात्मक होतं. अशा परिस्थितीत दीप्तीनं योग्य पर्यायची निवड केली हे कौतुक करण्यासारखं आहे. देवाचे आभार मानतो तो बरा होत आहे. सर्वांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत''.

श्रेयसच्या प्रकृतीबद्दल बॉबी देओलनं दिली माहिती :श्रेयसच्या प्रकृतीबद्दल माहिती देत बॉबी देओलनं सांगितलं होत की, ''मी नुकतेच त्याच्या पत्नीशी बोललो. ती खरंच अस्वस्थ झाली होती. श्रेयसच्या हृदय ठोके दहा मिनिटांसाठी थांबले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी त्याला पुन्हा जीवनदान दिलं आहे. त्यामुळे तो बरा होवो हीच प्रार्थना''. श्रेयसच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो 'गोलमाल पाच' , 'लव यू शंकर' आणि 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. मुंबई विमानतळावर शाहरुख खान, अनुष्का शर्मा झाले स्पॉट, पाहा व्हिडिओ
  2. वर्ष 2023 'जमाल कुडू' ते 'झूमें जो पठाण' या वर्षातील 9 लोकप्रिय गाणी
  3. किंग खानची सद्दी संपली? देशांतर्गत 'डंकी'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू, धक्कादायक अहवाल आला समोर
Last Updated : Dec 17, 2023, 2:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details