मुंबई- बॉलिवूडची 'क्वीन' कंगना राणौतने अलीकडेच 'इमर्जन्सी' या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटातील माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची व्यक्तिरेखा समोर आली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
अभिनेत्याने त्याचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे. श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर अटल बिहारी वाजपेयींचा पहिला लूक शेअर करताना लिहिले की, 'आणीबाणीच्या काळातील श्रेयस तळपदेचा अटल बिहारी वाजपेयी लूक सादर करत आहे, जे आणीबाणीच्या काळात राष्ट्रवादी आणि उदयोन्मुख नेते होते'.
या पोस्टसोबत श्रेयसने अटलजींची एक कविताही शेअर केली आहे. खाली वाचा.
- बाधाएं आती हैं आएं
घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हंसते-हंसते,
आग लगाकर जलना होगा।
कदम मिलाकर चलना होगा।
- अटल बिहारी बाजपेयी