महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Atal Bihari Vajpayee biopic : अटल बिहारी वाजपेयी यांचा बायोपिक 'मैं अटल हूं'च्या चित्रीकरणाला झाली सुरुवात! - पंकज त्रिपाठी यांचा फर्स्ट लुक

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट येत आहे. याच्या शुटिंगला अलिकडेच सुरुवात झाली. चतुरस्त्र अभिनेते पंकज त्रिपाठी यात अटलजींची भूमिका साकारत आहेत.

'मैं अटल हूं'च्या चित्रीकरणाला झाली सुरुवात!
'मैं अटल हूं'च्या चित्रीकरणाला झाली सुरुवात!

By

Published : May 10, 2023, 9:22 PM IST

मुंबई- बिगर काँगेसी सफल पंतप्रधानांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ते पहिल्यांदा फक्त १३ दिवसांचे पंतप्रधान राहिले. त्यानंतर दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे सरकार फक्त १३ महिने टिकू शकले परंतु तिसऱ्या वेळी मात्र अटल बिहारी वाजपेयी हे १९९९ ते २००४ या पूर्ण टर्मसाठी प्राईम मिनिस्टर होते. अर्थात राजकारणात आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे. म्हणूनच आता त्यांची पूर्ण ओळख दर्शविण्यासाठी त्यांच्या जीवनावर चित्रपट बनतोय ज्याचे नाव आहे मैं अटल हूं. अटल जी केवळ राजकारणी नव्हते तर कवी, सज्जन व्यक्ती आणि मुसद्दी नेतेदेखील होते. महत्वाचं म्हणजे या बायोपिकचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव करीत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत चतुरस्त्र अभिनेते पंकज त्रिपाठी.

या चित्रपटाच्या घोषणेवेळी पंकज त्रिपाठी यांचा फर्स्ट लुक बाहेर आल्यापासून त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्यांनी आज समाज माध्यमांवर पोस्ट केले की, अटलजींसारख्या महान नेत्याची भूमिका साकारण्याची संधी मिळणे, हा एक सन्मान आहे. बोलीभाषा, त्यांची जीवनशैली आणि भारताबद्दलची त्यांची दृष्टी समजून घेण्यासाठी आम्ही भरपूर वाचनसत्रे केली. आज ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करीत असल्याचा मला आनंद होत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरु झाले असून पुढे ते लखनौ मध्ये सुद्धा होणार आहे.

दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले की, “मी पंकजजींना अटलजींना जाणून घेण्याच्या आणि समजून घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होताना पाहिले आहे. मला खात्री आहे की एवढे प्रगल्भ व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी पंकजजींपेक्षा दुसरा कोणीही योग्य नसता. अटलजींनी त्यांच्या जीवनातून आणि देशासाठी त्यांची दृष्टी देऊन जी जादू निर्माण केली तीच जादू आमच्या चित्रपटातून निर्माण करण्याची आशा आहे.”

निर्माते विनोद भानुशाली म्हणाले की, मैं अटल हूं हा एक खास चित्रपट आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येकजण आमच्या प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम अनुभवांपैकी एक असावा यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. आमच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याआधी आम्ही कथेपासून, आमच्या प्रत्येक पात्राचा शोध घेण्यासाठी बरेच संशोधन केले आहे.”

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली, मैं अटल हूं मध्ये पंकज त्रिपाठी श्री अटलबिहारी वाजपेयी, यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे लेखन ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी केले आहे. मनोज मुंतशिर यांनी गीते लिहिली असून संगीताची बाजू सलीम-सुलेमान सांभाळत आहेत. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज प्रस्तुत 'मैं अटल हूं' ची निर्मिती केली आहे विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान आणि कमलेश भानुशाली यांनी. तसेच भावेश भानुशाली, ईशान दत्ता, जीशान अहमद आणि शिव शर्मा हे सहनिर्माते आहेत.

'मैं अटल हूं' हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा -Neha Dhupia : नेहा धुपियाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसोबतचे शेअर केले फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details