महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shiv Shastri Balboa : शिव शास्त्री बाल्बोआ चित्रपटाचे पोस्टर रिलीज! नीना गुप्ता-अनुपम खेर दिसले स्कूटर चालवताना - शिव शास्त्री बाल्बोआ हा एक बॉलीवूड ड्रामा चित्रपट

मल्याळम दिग्दर्शक अजयन वेणुगोपालन यांनी दिग्दर्शित केलेला शिव शास्त्री बाल्बोआ हा एक बॉलीवूड ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मनोरंजनात्मक आहे. त्यामुळे त्या चित्रपटाची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे. तसेच, यामध्ये अनुपम खेर मुख्य भूमिकेत असल्याने त्याचीही जोरदार चर्चा सुरी आहे.

Shiv Shastri Balboa
Shiv Shastri Balboa

By

Published : Jan 29, 2023, 7:32 PM IST

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्या आगामी 'शिव शास्त्री बलबोआ' या चित्रपटाचे नवे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. यामध्ये अनुपम खेर लाल शर्ट आणि काळ्या लेदर जॅकेटमध्ये डेनिमसह बाइक चालवताना दिसत आहेत. दुसरीकडे, चित्रपटाची नायिका नीना गुप्ता लाल-टी-शर्ट परिधान करून हातात डॉगी धरून राइडचा आनंद लुटताना दिसत आहेत. या चित्रपटाचे जे पोस्टर शेअर केले आहे त्यामध्ये एका हातात बॉक्सिंग ग्लोव्ह आणि दुसर्‍या हातात कुत्रा असे चित्र आहे.

जोडी मस्त लूकमध्ये आहे :अजयन वेणुगोपालन दिग्दर्शित या चित्रपटाची कथा अमेरिकेतील एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन भारतीय जोडप्यांची आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये नीना गुप्ता आणि अनुपम खेर मस्त दिसत आहेत. दोघांची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे. मोशन पोस्टर पाहूनच लक्षात येत आहे की, चित्रपट खूप धमाल करणार आहे. दरम्यान हे दोघे बाईकवर फइरताना दिसले आहेत. यामध्ये शर्टावर काळ्या रंगाचे लेदर जॅकेटही घातले आहे. एवढेच नाही तर त्यांनी डोळ्यांवर स्टायलिश चष्माही लावला आहे. यामध्ये अनुपम खेर बाईच चालवताना दिसत आहेत.

या दिवशी हा चित्रपट होणार प्रदर्शित :शिव शास्त्री बाल्बोआ मल्याळम दिग्दर्शक अजयन वेणुगोपालन यांनी दिग्दर्शित केलेला एक बॉलीवूड ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट (दि. 10 फेब्रुवारी 2023)रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले की, हा चित्रपट 'एका सामान्य व्यक्तीच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची कथा आहे जी तुम्हाला हसवेल आणि त्याच वेळी तुमच्या हृदयात आत्मविश्वासाची सुंदर भावना निर्माण करेल.' तसेच, हा चित्रपट इंग्रजीत असेल आणि अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्याशिवाय जुगल हंसराज, शारीब हाश्मी आणि नर्गिस फाखरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती किशोर वरित यांनी केली आहे.

दोन्ही कलाकार 'उंचाई'मध्ये दिसले होते एकत्र : अनुपम खेर आणि नीना गुप्ता नुकतेच सूरज बडजात्याच्या 'उंचाई' या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात नीनाने बोमन इराणी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती, तर अनुपम बोमन आणि अमिताभ बच्चन यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय अनुपम खेर लवकरच विवेक अग्निहोत्रीचा आगामी चित्रपट 'द वॅक्सीन वॉर' आणि कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :आलियासोबत कतरिनाही दिसली झोयाच्या घरी, आगामी चित्रपटसाठी भेटी-गाठी

ABOUT THE AUTHOR

...view details