महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटातील 'बम बम भोले' गाणे रिलीज - Bam Bam Bhole Marathi Song

डॉ. अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप - गरुडझेप हा आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहे. अलिकडेच या चित्रपटाचे शूटिंग चक्क दिल्लीच्या लाल किल्ल्यात झाले होते. आता या चित्रपटातील पहिले गाणे बम बम भोले रिलीज झाले आहे.

'बम बम भोले' गाणे रिलीज
'बम बम भोले' गाणे रिलीज

By

Published : Jul 25, 2022, 5:30 PM IST

मुंबई - डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत. आता ते शिवप्रताप - गरुडझेप या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या या चित्रपटाचे शूटिंग चक्क दिल्लीच्या लाल किल्ल्यात झाले. ही गोष्ट मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद मानली जाते. आता या चित्रपटातील पहिले गाणे बम बम भोले रिलीज झाले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडियावर हे गाणे शेअर केले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ''वेरूळच्या घृष्णेश्वराला, रायगडच्या जगदीश्वराला नमन करून..आपल्या "शिवप्रताप-गरुडझेप" सिनेमाचं पहिलं गाणं खास आपल्यासाठी! गीतकार - ऋषीकेश परांजपे, संगीत - शशांक पोवार, गायक - कैलाश खेर.. शिवरुद्राला वंदन करून सादर करत आहोत "शिवप्रताप गरुडझेप" मधलं पहिलं गाणं, 'बम बम भोले'.''

'बम बम भोले' गाणे रिलीज

गाण्याच्या सुरुवातील छत्रपती शिवाजी महाराज जिरेटोप परिधान करुन किल्ल्यात जाताना दिसतात. त्यानंतर शिवंलिंगावर अभिषेक होताना दिसत असून शिवभक्त 'बम बम भोले' या गाण्यावर नृत्य करताना दिसतात.

हेही वाचा -'ब्लॅक अँड व्हाईट'चा जमाना रंगीन बनवणारी अभिनेत्री रंजना देशमुखचा बायोपिक, "रंजना अनफोल्ड"!

ABOUT THE AUTHOR

...view details