महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shilpa Shetty at Golden Temple : शमिता, राज कुंद्रासोबत 'वाहेगुरु'च्या आश्रयाला पोहोचली शिल्पा; शेअर केला हा सुंदर फोटो - सुवर्ण मंदिर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. नुकतीच अमृतसरला पोहोचलेल्या शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर सुवर्ण मंदिरातील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे.

Shilpa Shetty at Golden Temple
शमिता राज कुंद्रासोबत वाहेगुरुच्या आश्रयाला पोहोचली शिल्पा

By

Published : Feb 28, 2023, 3:26 PM IST

मुंबई : बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच शिल्पाने तिच्या वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती 'बाजीगर' चित्रपटाच्या 'बाजीगर ओ बाजीगर' या शीर्षक गीतावर डान्स करताना दिसली होती. यादरम्यान ती मजेदार कार्डिओ स्टेप-वर्कआउट करताना दिसली होती. या व्हिडिओनंतर शिल्पाने सोमवारी तिच्या इंस्टाग्रामवर आणखी काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबासह सुवर्ण मंदिरात दिसत आहे.

शिल्पा शेट्टीने केली स्टोरी शेअर :शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ती तिची बहीण शमिता शेट्टी, पती राज कुंद्रासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये शिल्पा गुलाबी आणि पांढऱ्या रंगात सनग्लासेसमध्ये दिसत आहे. शमिताही पिच कलरमध्ये आणि पांढऱ्या सनग्लासेसमध्ये दिसत आहे. निळ्या जीन्ससह काळ्या टी-शर्टमध्ये राज कुंद्राही धमाल दिसत आहे.

भरभरून प्रेमाचा वर्षाव :शिल्पाने इंस्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती 'वाहेगुरु'च्या आश्रयाला हात जोडून एकटी बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत शिल्पाने गोल्डन टेंपल हॅशटॅगसह 'वाहेगुरु जी दा खालसा वाहेगुरु जी दी फतेह' असे कॅप्शन दिले आहे. शिल्पाच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. शिल्पा शेट्टी कुंद्रा कुटुंबासह सोमवारी अमृतसरला पोहोचली. विमानतळावर उतरताच तिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अभिनेत्रीसोबत तिची बहीण शमिता शेट्टी आणि पती राज कुंद्राही दिसले.

शिल्पा शेट्टीचा वर्क फ्रंट :शिल्पा आता तिच्या पहिल्या वेब सीरिज इंडियन पोलिस फोर्समध्ये दिसणार आहे. गोलमाल फेम रोहित शेट्टी दिग्दर्शित या मालिकेत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत. गेल्या वर्षी शोच्या शूटिंगदरम्यान शिल्पाचा पाय फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे ती दीर्घकाळ विश्रांतीवर होती.

हेही वाचा :sonu sood meets amarjeet jaikar : सोनू सूदने घेतली बिहारचा व्हायरल बॉय अमरजित जयकरची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details