मुंबई -मुंबईत झालेल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टीने रेड कार्पेटवर त्यांच्या अनोख्या अंदाजात दिसल्या. या वेगळ्या लुकमध्ये त्या फारच स्टनिंग दिसत होत्या. इंस्टाग्रामवर शिल्पाने तिच्या लूकचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. मी माझे पट्टे कमावले आहेत, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले. तिने काळ्या-पांढऱ्या रंगाचा पट्टे असलेला स्कर्ट निवडला ज्याचा क्रॉप टॉप अशाच डिझाइनचे आहे. तसेच तिने सोनेरी बांगड्या आणि नेकपीससह ग्लॅमरचे मॅचिंगघातले होते.
शिल्पा आणि रविना स्टनिंग लूक : शिल्पाच्या या लूकचे सोशल मीडियावर फार कौतुक होत आहे. एकाने त्यावर फायर इमोजी पोस्ट केले. या कार्यक्रमात रवीना शंतनू-निखिल या डिझायनर यांच्या कलेक्शनमधील कट-आउट फिट होते या ड्रेसमध्ये रविना सुंदर दिसत होती. रवीनाने अंबाडा पाडला होता, शिवाय तिने डोळ्यांचा मेक हा चमकदार केले होता. या लूकमध्ये रवीना फार देखणी दिसत होती. तिच्या या जोरदार लूकवर तिचे चाहते फिदा झाले आहे. रवीनाच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केली आहे. नीलम कोठारी सोनी यांनी लिहिले, 'लूकिंग स्टनिंग'. रवीनाची मुलगी अशा थडानी हिने कमेंट केली, 'तुझे आवडते फोटो.' काही नेटकऱ्यानी लिहलं खूप छान काहीनी लिहले खूप हॉट अशा काही कमेंट केल्या आहे.