मुंबई : अभिनेत्री शिबानी दांडेकरचे मॉडलिंग क्षेत्रातील मोठ नाव असून तिने मराठी चित्रपट 'टाईमपास'मधील एका गाण्यासाठी काम केलं आहे. शिबानीने आपल्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हजन टीव्ही शोमध्ये अँकरच्या रुपात केली होती. शिबानीने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. शिवाय अनेक जाहिरातीमध्येही तिने काम केले आहे . शिबानी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट फार सक्रिय असते व ती अनेकदा फोटोशूट करुन चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
शिबानी आणि फरहान अख्तर : आता पुन्हा एकदा शिबानीने पती फरहान अख्तरसोबत लव्ही-डवी इमेज टाकली आहे. यात शिबानी अतिशय गोड दिसत असून अभिनेता फरहान अख्तर देखील देखणा दिसत आहे. शिबानीने पांढऱ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे, तर फरहानने ग्रे रंगाचा कोट घातला असून पांढऱ्या रंगाची टि- शर्ट घातला आहे. या फोटोत दोघेही फार खूश दिसत आहेत. या फोटोवर अनेक नेटकऱ्याच्या प्रतिक्रिया आल्या आहे. काहीनी क्यूट कपल म्हटलं आहे तर काही नेटकऱ्यानी हार्ट इमोजी फोटोवर टाकले आहेत.