मुंबई- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे न्यूड ( Ranveer Sing nude photo ) फोटोशूट त्याच्यासाठी तापदायक ठरत आहेत. सोशल मीडियावर महिलांनी अभिनेत्याविरोधात आघाडी उघडली असून आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही ( Sherlyn Chopra ) थेट रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणवर ( Deepika Padukone ) निशाणा साधला आहे. या प्रकरणी रणवीर सिंग विरोधात यापूर्वीच एफआयआर दाखल झाली असून आता शर्लिनने दीपिकाला प्रश्नांच्या भोवऱ्यात उभे केले आहे. एकदा दीपिकाने शर्लिनच्या ड्रेसबद्दल विचित्र एक्सप्रेशन दिले होते, त्या प्रसंगाचा संदर्भ देत तिने काही प्रश्न विचारले आहेत.
शर्लिनने दीपिकावर दाखवला रुबाब - मुंबईतील एका एनजीओने न्यूड फोटोशूटद्वारे महिलांच्या भावना दुखावल्याप्रकरणी रणवीर सिंहविरोधात एफआयआर दाखल केली आहे. दरम्यान, मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुलाखत व्हायरल होत आहे.
मीडियानुसार शर्लिनने मुलाखतीत दीपिका पदुकोणला टोमणा मारला आहे. शर्लिनने दावा केला आहे की, एकदा दीपिकाने तिच्या ड्रेसबद्दल विचित्र एक्सप्रेशन दिले होते. शर्लिन चोप्रा म्हणाली, 'जेव्हा मी एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी बोल्ड शूट केले, तेव्हा समाजाने मला चारित्र्यहीन आणि इतर अनेक नावांनी संबोधले. या दोन गोष्टी कशासाठी? हा दांभिकपणा कशासाठी? मी जेव्हा शूट केले तेव्हा माझ्या अंगावर किडे पडले होते का?'