मुंबई :बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने शहनाज गिलच्या टॉक शोमध्ये सहभाग घेतला, ज्यामध्ये दोघांनी मजेदार आणि स्पष्ट संभाषण केले. चॅट शो दरम्यान नवाजने शहनाजला तिच्या आयुष्यातील आकांक्षांबद्दल विचारले. तिने यावेळी सांगितले की, आयुष्यात तिला फक्त प्रेम हवे आहे. मात्र, प्रेमात तुमच्या पाठीत वार करण्याची प्रवृत्ती बहुतेक लोकांची असते, असे तिने ठामपणे सांगितले. शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, यांची भेट ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये झाली होती, यावेळी त्यांची मैत्री झाली आणि त्यांचे नाते घट्ट झाले. दोघेंही त्याच्या नात्याबद्दल कधीच मोकळे झाले नसतानाही, सलमान खान आणि त्यांच्या जवळच्या इतरांनी याबद्दल प्रतिक्रिया केली होती दोघे प्रेमामध्ये आहे. या टॉक शो दरम्यान, बिग बॉस फेम शहनाझने नवाजुद्दीनला कबूल केले की तिला प्रेमात फारसे पडले नाही आणि तिचे सुरुवातीचे ध्येय फक्त कोणत्याही प्रकारे कॅमेऱ्यासमोर दिसणे हे होते.
नवाजुद्दीन सिद्दीकी मुलाखत : त्यानंतर शहनाझने नवाजुद्दीनला ऑस्कर अवार्ड जर तुम्हाला भेटला तर काय भाषण तुम्ही देणार त्यावर नवाज हसला आणि त्यांनी म्हटले की, 'हे माझ्यासाठी फार चांगल आहे, मला अवार्ड मिळाल्याबद्दल धन्यवाद'. त्यानंतर प्रेमाबद्दल नवाजला शहनाजने विचारले तेव्हा, त्याने म्हटले की, प्रेमामध्ये पागलपण पाहिजे, जर प्रेमात पागलपण नसेल तर ते प्रेम एक वाटाघाटी करणारे असते. पागलपण हे जरूरी आहे असेही त्याने म्हटले. त्याने पुढे सांगितले की, नार्मल लोक अभिनय क्षेत्रात येत नाही. कोणी पागल व्यक्ती असेल तो अभिनयात येतो. या क्षेत्रात समोर यश मिळेल की नाही हे काही माहित नसते त्यामुळे पागल व्यक्तीच अभिनयात येऊ शकतात. असे त्याने सांगितले. त्यानंतर नवाजने शहनाजला विचारे की, तू कधी विचार केला असेल ना की, तुला अभिनय करायचा आहे की आणखी काही, त्यावर शहनाज म्हटले की, 'मला माहित नव्हते अभिनयबद्दल मला आता सर्व कळायला लागला आहे की, अभिनय काय असतो.