मुंबई- Shehnaaz Gill on Niagara Falls : थँक यू फॉर कमिंग या आगामी चित्रपटाची टीम सध्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट (TIFF) महोत्सवासाठी रवाना झाली आहे. महिला केंद्रीत या चित्रपटाची नायिका आणि प्रसिद्ध पंजाबी गायिका शहनाज गिल या टीममध्ये आहे. या दौऱ्यातून वेळ काढून तिने जग प्रसिद्ध नायगर धबधब्याला भेट दिला आणि निसर्गाचा हा अनोखा चमत्कार अनुभवला. शहनाझने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ चाहत्यांसाठी टाकला आहे. तिच्या चाहत्यांना अपडेट देण्यासाठी तिनं तिच्या परदेश दौऱ्यातील झलक शेअर केली आहे.
शहनाजने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या आईसोबतच्या एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्येअभिनेत्री शहनाज गिल कमीतकमी मेकअपसह खूपच मोहक दिसतेय. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF ) महोत्सवाच्या रेड कार्पेटवर जलवा दाखवल्यानंतर तिने या सुंदर ठिकाणाला भेट दिलीय. या व्हिडिओमध्ये, गिलने बेबी पिंक हुडी परिधान केल्याचं दिसतंय.
आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्याकडे निर्देश करताना व्हिडिओच्या सुरुवातीला शहनाज दिसते. धबधब्याचा आनंद घेताना तिनं गुलाबी रेडकोटही घातल्याचं दिसतंय. तिच्यासोबत तिची आई परमिंदर कौर गिल आनंदात साथ देताना दिसते. कॉफीचा मग हातात घेऊन तिने या सुंदर दिवसाची सांगता केलीय.
शहनाजने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेचच तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतल्या मित्रांनी रेड हार्ट इमोटिकॉन्ससह कमेंट सेक्शनमध्ये हाऊसफुल्ल गर्दी केली. तिच्या दिसण्यावर भरपूर प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
यंदाच्या सध्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF) थँक यू फॉर कमिंग हा एकमेव भारतीय फीचर चित्रपट दाखवण्यात आला. एकट्याने स्त्री म्हणून जगताना प्रेम आणि आनंदाचा सोध घेणाऱ्या स्त्रीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. शहनाजसह या चित्रपटात भूमी पेडणेकर, शिबानी बेदी, डॉली सिंग आणि कुशा कपिला या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.