मुंबई- विकी कौशल आणि "पंजाब की कतरिना कैफ" शहनाज गिल आगामी चॅट शोच्या सेटवर पुन्हा एकत्र आले आहेत आणि त्यांचे फोटो चाहत्यांना शोसाठी उत्साही बनवत आहेत. बुधवारी, शहनाजने विकीसोबत पोस्टरचा एक सेट पोस्ट केला, जो सध्या त्याच्या आगामी 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे आणि त्याचे चाहते या चित्रपटाची आवर्जुन प्रतीक्षा करत आहेत.
फोटोंसोबत, शहनाजने लिहिले की, "तुम्ही क्वचितच एखाद्या स्टारला भेटता ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात. तुम्ही या व्यक्तीला युगानुयुगे ओळखत आहात आणि ही एक फॅमिली आहे, अशी भावना तुम्हाला फार क्वचितच येते. फार क्वचितच, तुमच्या दुसऱ्या भेटीत, तुम्हाला असे वाटते की तुम्ही या व्यक्तीला ओळखता जसे की तो एक फॅमिली मेंबर आहे. माझा अंदाज आहे की हा खरा स्टार आहे. विकी कौशल, तुला पुन्हा एकदा भेटून मला आनंद झाला आहे आणि आजच्या गप्पा फक्त संभाषणांपेक्षा जास्त होत्या... मी तुला यश, चांगेल आरोग्य आणि कायम सकारात्मक राहण्यासाठी शुभेच्छा देते. गोविंदा ना मेरा चित्रपटासाठी तुला शुभेच्छा."
विकीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो पुन्हा शेअर केले आणि शहनाजसाठी एक गोड नोट लिहिली. त्याने लिहिले, "किती छान आनंददायी भेट झाली आणि गप्पा झाल्या, शहनाझ. तू खूप शुध्द मनाची आहेस. तुझ्या भल्यासाठी शुभेच्छा. विकी x शहनाज," व्हाइट हार्ट इमोटिकॉन्सच्या गुच्छासह.