महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रितेश देशमुख आणि जॉन अब्राहमसोबत शहनाझ गिलच्या 100% ची घोषणा - Riteish Deshmukh and Shehnaaz Gill

सोमवारी शहनाज गिलने तिच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे शीर्षक 100% असे असेल. साजिद खानच्या दिग्दर्शनाखाली 100% हा चित्रपट पुढील वर्षी फ्लोअरवर जाईल आणि दिवाळी 2023 ला रिलीज होईल.

शहनाझ गिलच्या 100% ची घोषणा
शहनाझ गिलच्या 100% ची घोषणा

By

Published : Aug 29, 2022, 4:45 PM IST

मुंबई अभिनेत्री शहनाज गिलने तिच्या आगामी 100% या चित्रपटाची घोषणा केली ज्यामध्ये ती जॉन अब्राहम, रितेश देशमुख आणि नोरा फतेही यांच्यासोबत झळकणार आहे. सलमान खानची भूमिका असलेल्या 'कभी ईद कभी दिवाळली' नंतर आगामी चित्रपट शहनाजचा दुसरा हिंदी चित्रपट असेल. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सोमवारी शहनाजने सोशल मीडियावर तिच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट साजिद खान दिग्दर्शित करणार आहे. "प्रेम, लग्न, कुटुंब आणि हेर" अशी कथाअसलेला हा चित्रपट टीसीरीजचे प्रमुख भूषण कुमार आणि अमर बुटाला निर्मिती करणार आहेत.

प्रॉडक्शन बॅनरने एका छोट्या टीझर व्हिडिओसह ट्विटरवर चित्रपटाची घोषणा केली. "70% नाही 80% नाही तर 90% देखीलही नाही!! आम्ही तुम्हाला कॉमेडी, अॅक्शन, संगीत आणि हेरांनी परिपूर्ण असलेल्या 100 टक्के मनोरंजनाची हमी देतो. दिवाळी 2023 मोठी होणार आहे!" असे T-Series च्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुढील वर्षी 100% हा चित्रपट फ्लोअरवर जाईल आणि दिवाळी 2023 ला रिलीज होईल. दिग्दर्शक साजिद खान हा बेबी आणि दोन हाऊसफुल चित्रपटांसाठी ओळखला जातो, त्याने 2014 च्या हमशकल्स या चित्रपटाचे शेवटचे दिग्दर्शन केले होते.

हेही वाचा -पाय फ्रक्चर आहे हात नाही म्हणत शिल्पा शेट्टीचे जिममध्ये वर्कआउट

ABOUT THE AUTHOR

...view details