मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडियावर तिचा पती सैफ अली खान, मोठा मुलगा तैमूर अली खान आणि लहान मुलगा जेह असलेले कौटुंबिक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत 'माझ्या आयुष्यातील पुरुष' सोबत परफेक्ट क्लिक करणे किती कठीण आहे हे देखील करीनाने स्पष्ट केले.
"कौटुंबिक फोटो काढण्याचा प्रयत्नात हे असे दिसते - सैफू कृपया फोटोसाठी स्माईल कर...टिम आपल्या नाकातून बोट काढ...जे बाबा इकडे बघ... मी - अरे कोई फोटो लो यार... क्लिक.'' असे लिहित तिने माझ्या आयुष्यातील पुरूष व माझे जग असे दोन हॅशटॅगही दिले आहेत. गुरुवारी अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नात करानाचा हा कौटुंबिक फोटो काढण्यात आला होता.