मुंबई - Vrushabha Shoot :दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल आणि अभिनेत्री शनाया कपूर यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित 'वृषभ-द वॉरियर्स अराइज' चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग मुंबईत सध्या सुरू होणार आहे. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर, चित्रपटाची टीम आणि स्टार कास्ट दुसरे शेड्यूल सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान आता शनाया कपूरनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तिच्यासोबत चित्रपटामधील संपूर्ण टीम दिसतेय.
शनाया कपूरनं शेअर केला फोटो :शनाया कपूरनं फोटो शेअर करत लिहलं, 'वृषभ-द वॉरियर्स अराइज'ची क्रेझ आणि उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे! चित्रपट 'वृषभ-द वॉरियर्स अराइज'चे 2 शेड्यूलचे शूटिंग आजपासून मुंबईत सुरू होत आहे. हे शेड्यूल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये शूट केलं जाईल. चित्रपट निर्माते दसरा सणाच्या शुभ दिवशी जगभरातील चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतील. चित्रपटाचे मुंबई शेड्यूल नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.
वृषभ-द वॉरियर्स अराइज' टीम एकत्र : शनाया कपूनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मोहनलाल झाहरा एस खान आणि तेलुगू अभिनेता रोशनसोबत दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे. अलीकडेच एकतानं अभिनेता मोहनलालच्या सहकार्यानं तिच्या 'वृषभ' या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. एकता कपूरनं तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये पहिल्या फोटोमध्ये ती मोहनलाल आणि तिचे वडील जितेंद्रसोबत होती. या फोटोमध्ये तिघेही फोटोसाठी पोझ देत होते. याशिवाय दुसऱ्या फोटोमध्ये तिच्यासोबत 'वृषभ-द वॉरियर्स अराइज' चित्रपटामधील टीम दिसत होती. या फोटोवर कॅप्शन देत तिनं लिहलं होतं, 'अलौकिक बुद्धिमत्ता आणि द लीजेंडसोबत पोझ देत आहे !!!! जय माता दी... मोहनलाल या अभिनेत्याच्या बरोबरीनं काम करण्यासाठी मी खूप उत्साही आहे'.
दसर्याच्या शुभ दिवशी चित्रपटाबद्दल होईल घोषणा :पुढं एकतानं लिहलं, 'बालाजी टेलिफिल्म्स, कनेक्टिकट मीडिया आणि एव्हीएस (AVS) स्टुडिओनं मेगास्टार मोहनलाल यांच्यासोबत पॅन इंडियानं द्विभाषिक तेलुगू, मल्याळम चित्रपट 'वृषभ'साठी भागीदारी केली आहे. 'वृषभ' 2024 सालातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जाणारा आहे. नंद किशोर दिग्दर्शित 'वृषभ' या चित्रपटाचं शूटिंग या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असून मल्याळम, तेलुगू, कन्नड, तामिळ आणि हिंदीमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. दसर्याच्या शुभ दिवशी निर्माते जगभरातील रिलीजची तारीख जाहीर करतील', असं तिनं चाहत्यांना सोशल मीडियावर सांगितलं होतं.
हेही वाचा :
- Rajkummar Rao And Patralekha : राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखाचा रोमँटिक व्हिडिओ झाला व्हायरल; पहा व्हिडिओ...
- Rahul Chopra in role of Nitin Gadkari : 'गडकरी' चित्रपटामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा
- Sam Bahadur teaser: मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर टीझर'मध्ये विकी कौशलवर खिळल्या सर्वांचा नजरा