मुंबई- रणबीर कपूर चार वर्षांच्या विश्रांतीनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा दमदारपणे परतला आहे. शमशेरा चित्रपटातील त्याच्या कणखर भूमिकेने तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित शमशेरा हा पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट नेटिझन्सच्या मते आतापर्यंत हिंदी चित्रपट निर्मात्यांकडून आलेला एक सभ्य चित्रपट आहे.
शमशेराची कथा काझा या काल्पनिक शहरात घडते. येथे शुद्ध सिंग नावाच्या निर्दयी हुकूमशाही सेनापतीने योद्धा जमातीला कैद करुन गुलाम बनवले आहे आणि त्यांचा छळ चालवला आहे. गुलाम बनलेल्या माणसाची ही कथा आहे. जो आपल्या जमातीच्या हक्कांसाठी त्यांचा नेता बनतो आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करतो.
दिग्दर्शक करण मल्होत्रा याने यापूर्वी सांगितले होते की आगामी चित्रपट शमशेरासाठी पार्श्वभूमी सात महिन्यांत तयार करण्यात आली होती. मेहनतीचे मोबदला मिळत आहे असे दिसते आहे कारण चित्रपट रसिकांनी चित्रपटाचे कौतुक सुरु केले आहे. आज हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर या महाकाव्य संघर्षाचा जबरदस्त अनुभव प्रेक्षक घेत आहेत.
करणने दिग्दर्शित केलेला हा अॅक्शन चित्रपट आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्सने निर्मित केला आहे आणि तो हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट जितका यशराज फिल्म्ससाठी महत्त्वाचा आहे तितकाच तो त्यातील प्रमुख व्यक्ती रणबीरसाठीही आहे. शमशेराच्या आधी या बॅनरचे तीन चित्रपट रिलीज झाले आहेत. तीन चित्रपटांमध्ये बंटी और बबली 2, जयेशभाई जोरदार आणि सम्राट पृथ्वीराज यांचा समावेश आहे जे बॉक्स ऑफिसवर कोणतीही छाप पाडू शकले नाहीत. शमशेराला YRF साठी जिंक्स ब्रेकर म्हणून ओळखले जात आहे आणि सोशल मीडियावर याची माऊथ पब्लिसिटी होताना दिसत आहे.
ड्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी मात्र या चित्रपटाच्या वन वर्ड रिव्ह्यूमध्ये कंटाळवाना चित्रपट असल्याचे म्हटले आहे. हा चित्रपट पाहून पुन्हा एकदा फ्लऑप झालेल्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'ची आठवण झाल्याचे आदर्श यांनी म्हटलंय.
चित्रपट समीक्षक कोमल नहाटा यांनीही चित्रपटाला प्रतिसाद नसल्याचे ट्विट केले आहे. प्रक्षक नसल्यामुळे शो रद्द करण्यात आव्याचेही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा -रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंना दीपिकाने परवानगी दिली होती का? नेटिझन्सचा सवाल