मुंबई - Ajay Devgn supernatural thriller :अजय देवगणच्या आगामी सुपरनॅचरल थ्रिलर 'शैतान'मध्ये ज्योतिका आणि आर माधवन हे सहकलाकार आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षक पोस्टरचे लॉन्चिंग केले आणि दोन दशकांहून अधिक काळानंतर हिंदी चित्रपटामध्ये पुनरागमन करत असलेल्या अभिनेत्री ज्येतिकाच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच याची निर्मितीही अजय देवगण करत आहे.
सोशल मीडियावर अजयने 'शैतान'चे एक मनोरंजक शीर्षक पोस्टर शेअर केले. 'शैतान'च्या रिलीजची तारीख जाहीर करताना अजयने इंस्टाग्रामवर लिहिले, "शैतान तुमच्यासाठी 8 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात येत आहे."
विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटातून गुजराती अभिनेत्री जानकी बोडीवाल हिंदीमध्ये पदार्पण करत आहे. जियो स्टुडिओज, अजय देवगण फिल्म्स, आणि पॅनोरम स्टुडिओ इंटरनॅशनल यांनी प्रस्तुत केलेल्या या चित्रपटाची निरमिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. 'शैतान' चित्रपटाचे जून 2023 मध्ये शूटिंग सुरू झाले होते. या थ्रिलर चित्रपटाचे मुंबई, मसुरी आणि लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर शूटिंग करण्यात आल्याचे सांगितले जाते.