मुंबई - Shah Rukh Khan :बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं 2 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. जगभरात किंग खानचे खूप चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमते. खास प्रसंगी, किंग खानच्या मन्नतच्या घराबाहेर चाहतेदेखील जमले होते. त्यानंतर अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर किंग खाननं देखील त्याच्या चाहत्यांचे आभार मानले होते. दरम्यान शाहरुखला अनेक सेलिब्रिटींनी देखील या खास प्रसंगी शुभेच्छा दिल्या.आता किंग खान प्रत्येकजणांना धन्यवाद म्हणत आहे. शाहरुख खानचा हा वाढदिवस खूप खास ठरला. कारण 2023मध्ये त्यांच्या 'जवान' आणि 'पठाण'ने जबरदस्त कमाई करून विक्रम रचला आहे.
शाहरुख खान मानले आभार :शाहरुख खानसाठीसचिन तेंडुलकरनं लिहलं, प्रेम, आणि ‘शाहरुख खान’ या शब्दांमध्ये काय साम्य आहे? हा प्रेमाचा समानार्थी शब्द आहेत'. त्यानंतर शाहरुखनं लिहलं, 'ग्रेस डिग्निटी क्लास आणि मास्टर क्लासमधील समानता आम्हा सर्वांना माहीत आहे'. धन्यवाद आणि तुझ्यावर प्रेम'. त्यानंतर हरभजन सिंगनं लिहलं, 'बॉलीवूडचा एक आणि एकमेव बादशाह, एक सुपर डुपर स्टार तरीही अत्यंत नम्र आणि दयाळू माणूस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. तुम्ही एक प्रेरणा आहात.. तुम्हाला आरोग्य, यश, शांती आणि आनंद लाभो'. यावर किंग खाननं 'धन्यवाद पाजी!! तुम्हीही आनंदी राहा'.