मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांनी 'पठाण'मध्ये स्क्रीन स्पेस शेअर करून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद दिला. 'पठाण' चित्रपटात एकत्र काम करण्याबाबत दोन्ही कलाकारांनी मोकळेपणाने बातचीत केली. सलमान म्हणाला, 'शाहरुख आणि माझ्यासाठी मोठ्या पडद्यावर एकत्र येण्यासाठी नेहमीच एक खास चित्रपट लागतो आणि मला आनंद आहे की 'पठाण' हा तो चित्रपट आहे. जेव्हा आम्ही 'करण अर्जुन' केला तेव्हा तो ब्लॉकबस्टर होता आणि आता YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असलेला पठाणही ब्लॉकबस्टर ठरला आहे.
सलमान खान म्हणाला, 'मला माहित आहे की प्रेक्षकांना आम्हाला पडद्यावर एकत्र पाहणे आवडते आणि मला आनंद आहे की त्यांनी आम्हाला पठाणमध्ये इतके प्रेम दिले आहे. जेव्हा आदिने मला या मालिकेबद्दल आणि आम्हाला पुन्हा पडद्यावर एकत्र आणण्याच्या त्याच्या दृष्टीबद्दल सांगितले तेव्हा मला खूप आनंद झाला.'
त्याचवेळी शाहरुख खान म्हणाला, 'मी जेव्हा हे सांगतो तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा, सलमान आणि मला नेहमीच एकत्र काम करायचे होते, परंतु आम्ही योग्य चित्रपटाची, योग्य स्क्रिप्टची वाट पाहत होतो. कारण आम्हा दोघांना माहीत होते की चाहते आम्हाला पडद्यावर पाहण्यास उत्सुक असतील, पण आम्हाला ते घडवून आणायचे होते. पठाणच्या आधी शाहरुख आणि सलमानने 'करण अर्जुन', 'कुछ कुछ होता है' आणि 'हम तुम्हारे हैं सनम'मध्ये एकत्र काम केले आहे. शाहरुखनेही सलमानसोबत वर्षांनंतर काम केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सलमान खानचा आगामी टायगर हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख खान झळकणार अशी चर्चा गेली अनेक दिवसापासून रंगत होती. नुकतेच यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ट्रेड व्यवसायातीस तज्ञ तरण आदर्श यांनी याबद्दलची घोषणा ट्विट करुन केले होते. त्यांनी लिहिले की, 'शाहरुख आणि सलमान यांनी पठाण या चित्रपटात जादू केली. हे दोन दिग्गज खान दिवाळीला रिलीज होणाऱ्या टायगर ३ मध्ये पुन्हा एकत्र येणार आहेत. यळऱाज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालेल यात कोणतीच शंका नाही. हा एक नवे विक्म रचणारा चित्रपट असेल.'
शाहरुख सलमानच्या एकत्र शुटिंगचे शेड्यूल - शाहरुख खान लवकरच टायगर 3 चे शूटिंग सुरू करेल असे म्हटले जाते, अशा प्रकारे टायगर फ्रँचायझीमध्ये त्याच्या उपस्थितीची पुष्टी होईल. आदित्य चोप्राच्या गुप्तचर विश्वामधील चित्रपटात शाहरुख, सलमानसह ह्रतिक रोशन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. लेटेस्ट बझनुसार, टायगर 3 साठी शाीहरुखचे शूट शेड्यूल 25 जानेवारी, 2023 नंतर लगेचच नियोजित केले जात आहे. आगामी शेड्यूलमध्ये, निर्माते शाहरुख आणि सलमानचा समावेश असलेला एक थरारक अॅक्शन एक्स्ट्रावागांझा तयार करतील. टायगर 3 मध्ये शाहरुखची उपस्थिती हा एक मोठ्या प्रमाणावर आरोहित अॅक्शन सीक्वेन्स असेल जेथे पठाण आणि टायगर एका अतिशय निर्णायक सीनसाठी एकत्र येतात. 27 वर्षांनंतर एका चित्रपटासाठी दोघे पडद्यावर एकत्र येत असल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक मोठा सिनेमॅटिक क्षण असेल.
हेही वाचा -Prequel Of Kantara : ऋषभ शेट्टीने केली कंताराच्या भव्य प्रीक्वेलची घोषणा