मुंबई : पंजाबची 'कतरिना कैफ' आणि 'बिग बॉस 13' मधून लोकप्रिय झालेली सर्वांची आवडती शहनाज गिल आज लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे. शहनाजची निरागसता, तिची नखरेबाज शैली आणि सौंदर्याचे आज सर्वांनाच वेड लागले आहे. शहनाज गिल आज (27 जानेवारी) तिचा 29 वा वाढदिवस साजरा करीत आहे. शहनाजने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला, जो चाहत्यांना खूप आवडला.
शहनाजच्या इंस्टाग्रामवर वाढदिवसाचा व्हिडिओ :शहनाज गिलचे पूर्ण नाव शहनाज कौर गिल आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करताना शहनाजने कॅप्शनमध्ये लिहिले, 'एक वर्ष जुनी. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा व्हिडिओ शहनाजच्या वाढदिवसाच्या आदल्या संध्याकाळचा आहे, ज्यामध्ये ती तिची टीम, कुटुंब आणि मित्रांसोबत हॉटेलच्या खोलीत केक कापताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये अभिनेता वरुण शर्मासुद्धा :या व्हिडिओमध्ये अभिनेता वरुण शर्माही दिसत आहे. यादरम्यान शहनाज वाढदिवसाच्या गाण्यावर डान्स करतानाही दिसली. या खास प्रसंगी शहनाज प्रिंटेड सलवार कुर्ता परिधान करून केक कापण्यासाठी हॉटेलच्या रुममध्ये पोहोचली. जिथे तिची टीम, कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी तिचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. शहनाजची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडते. कमेंट बॉक्स अभिनंदन आणि शुभेच्छांनी भरलेला आहे.