महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Movie clash: 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटासोबत भिडणार शाहिद कपूरचा 'अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी'

शाहिद कपूर आणि क्रिती सेननचा चित्रपट 'अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी'च्या निर्मात्यांनी नुकतीच रिलीज डेट जाहीर केली आहे. सारा आणि आदित्यच्या 'मेट्रो इन दिनों'सोबत हा चित्रपट डिसेंबरच्या सुरुवातीला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

Movie clash
चित्रपटांमध्ये टक्कर

By

Published : Jun 19, 2023, 1:00 PM IST

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा 'अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' नावाचा रोमँटिक चित्रपट आणि अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांचा 'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट डिसेंबर 2023 ला रिलीज होणार आहे. शाहिद आणि क्रितीचा चित्रपट 7 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, तर अनुराग बसूचा 'मेट्रो इन दिनो' 8 डिसेंबर 2023 रोजी रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. म्हणजे डिसेंबरमध्ये या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच लढत होणार आहे.

शाहिद कपूर आणि क्रिती सेननचा चित्रपट 'अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी'च्या निर्मात्यांनी नुकतीच रिलीज डेट जाहीर केली आहे. सारा आणि आदित्यच्या 'मेट्रो इन दिनों'सोबत हा चित्रपट डिसेंबरच्या सुरुवातीला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी: सोमवारी, शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या आगामी चित्रपटाची रिलीज तारीख निर्मात्यांनी जाहीर केली. इंस्टाग्रामवर प्रोडक्शन हाऊस मॅडॉक फिल्म्सने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहले, '7 डिसेंबर 2023 रोजी उलगडणाऱ्या अशक्यप्राय प्रेमकथेसाठी तुमचे कॅलेंडर चिन्हांकित करा'!. Jio स्टुडिओ आणि दिनेश विजन यांनी शाहीद कपूर आणि क्रिती सेनन यांना एकत्र घेवून एक रोमँटिक चित्रपट बनविला आहे. पहिल्यांदाच शाहीद आणि क्रिती रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. यात डिंपल कपाडिया आणि धर्मेंद्र यांच्याही भूमिका आहेत. तसेच या चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन आहे.

मेट्रो...इन दिनों: दुसरीकडे, आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खानचा चित्रपट 'मेट्रो इन दिनों' हा 8 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केले आहे. या चित्रपटात आदित्य आणि सारा व्यतिरिक्त कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खेर, फजल आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मेट्रो...इन दिनों', या चित्रपटाचे शीर्षक 'मेट्रो' चित्रपटातील 'इन दिनों या लोकप्रिय गाण्यावरून काढले आहे. हा चित्रपट, आधुनिक काळावर आधारित मानवी नातेसंबंधांवर आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या कहाणी दाखविल्या जाणार आहे. 'अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' आणि 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटामध्ये जोरदार भिडण होणार आहे त्यामुळे कुठला चित्रपट जास्त बॉक्स ऑफिसवर कमाई करेल हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. Tu Maja Sobti : 'मुलगी झाली हो' मधील दिव्या पुगांवकर म्हणतेय 'विठ्ठल माझा सोबती'!
  2. Saurabh Gokhale in Fauji: ‘फौजी’ साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक असले तरी आनंददायी - सौरभ गोखले
  3. Demand To Ban Adipurush: संपूर्ण देशात 'आदिपुरुष' या चित्रपटावर बंदीची मागणी, भाजप नेत्यांनीही केला निषेध

ABOUT THE AUTHOR

...view details