महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Deva Release Date : शाहीद कपूरच्या आगामी 'देवा' चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर - देवा

Deva Release Date : शाहीद कपूरचा आगामी चित्रपट 'देवा'ची रिलीज तारीख जाहीर झाली आहे. या चित्रपटामध्ये तो पहिल्यांदा पूजा हेगडेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Deva Release Date
देवाची रिलीज तारीख

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 5:07 PM IST

मुंबई - Deva Release Date :शाहिद कपूर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिदनं 2003 मध्ये रोमँटिक कॉमेडी 'इश्क-विश्क' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं अनेक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. शाहिदचा 'कबीर सिंग' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता. या चित्रपटानं त्याचं करिअर एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. याशिवाय त्यानं ओटीटीवरही 'फर्जी' आणि 'ब्लडी डॅडी'याद्वारे खळबळ उडवून दिली. आता सध्या शाहिद पुन्हा एकदा 'देवा' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

'देवा' चित्रपटाची तारीख झाली जाहीर : दसऱ्याच्या मुहूर्तावर शाहिद कपूरनं त्यांच्या आगामी 'देवा' चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर हा अ‍ॅक्शम मोडमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तो पूजा हेगडेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. 'देवा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या आगामी चित्रपटाचे शीर्षक प्रसिद्ध केले आहे. 'देवा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. शाहिदच्या या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप आतुर आहेत. या चित्रपटाकडून शाहिदला खूप अपेक्षा आहेत.'देवा'मध्ये शाहिद हटके अंदाजात दिसणार आहे.

शाहिदचा 'देवा'मधील फर्स्ट लूकही आलं समोर : दरम्यान निर्मात्यांनी 'देवा'मधील शाहिद कपूरचा लूकही उघड केला आहे. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये शाहिद पांढऱ्या शर्ट, लहान केस आणि दाढीमध्ये दिसत आहे. याशिवाय त्यानं सनग्लासेसही लावला आहे. तसेच त्याच्या हातात बंदूक दिसत आहे. या लूकमध्ये तो रावडी दिसत आहे. व्हायरल झालेल्या या लूकचं सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. एका यूजरनं कमेंट करत या लूकचं कौतुक करत म्हटलं, 'तुझं लूक खूप खास आहे' त्यानंतर दुसऱ्या एकानं म्हटलं, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी नक्कीच पाहील' याशिवाय काहीजणांनी या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.

हेही वाचा :

  1. Bharat Jadhav new Drama Astitva : भरत जाधवचं 'अस्तित्व' नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला ; कधी होणार प्रयोग जाणून घ्या...
  2. Happy Birthday Prabhas : क्रिती सेनॉन वाढदिवसानिमित्त दिल्या प्रभासला शुभेच्छा; केली खास पोस्ट शेअर...
  3. Kangana perform Ravan Dahan : कंगना रणौतच्या हस्ते होणारे दिल्लीतील रावण दहन, लव कुश रामलीला समितीचा ऐतिसाहासिक निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details