महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shahid Kapoor royal photos : शाहिद कपूरने सिड कियाराच्या लग्नातील शाही थाटातील फोटो केले शेअर - अ‍ॅमेझॉन ओरिजिनल सीरिजमध्ये फर्जी

अभिनेता शाहिद कपूरचे शाही थाटामाटातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सिड कियाराच्या लग्नाच्या प्रसंगातील आहेत. जैसलमेरच्या सुर्यगढ पॅलेसमध्ये काढलेले हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

शाहिद कपूर
शाहिद कपूर

By

Published : Feb 22, 2023, 12:27 PM IST

मुंबई- अभिनेता शाहिद कपूरने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नातला सुवर्ण क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे. या सेलेब्रिटी लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे मोजके कलाकार उपस्थित होते, त्यामध्ये शाहिद आणि त्याची पत्नी मीराचा समावेश होता. सिद्धार्थ कियाराच्या लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर काही दिवसांनी शाहिदने शाहिदने जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमधील फोटो शेअर केले आहेत. यात त्याचा शाही लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

शाहिद कपूर

एथनिक व्हायोलेट कुर्ता, काळी पँट आणि मुद्रित बेज शॉल परिधान केलेल्या शाहिदने सिड-कियाराच्या लग्नात निश्चितपणे राजेशाही थाट दाखवला आहे. त्याच्या या सुंदर फोटोतील त्याचे राजबिंडे रुप चाहत्यांसह सर्वांनाच आवडणारे असेच आहे. या फोटोला त्याने 'सनी आणि सूर्यप्रकाश', असे कॅप्शन दिले आहे. त्याचा अलिकडे ओटीटीवर प्रदर्शित झालेली फर्जी या मालिकेत त्याचे नाव सनी आहे. त्याच संदर्भात त्याने हे कप्शन दिले आहे. कारण फर्जी ही मालिका त्याला यशाची पुन्हा एकदा चव चाखायला लावत आहे. यातील त्याची धडपड्या तरुणाची सनी ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

शाहिद कपूर

शाहिदच्या या सुंदर फोटोंना नेटिझन्सकडून अनेक कमेंट्स आणि लाईक्स मिळाले आहेत. 'हॅलो हँडसम', अशी एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली. तर 'मिस्टर रॉयल', असे दुसर्‍याने लिहिले. त्याचे कमेंट सेक्शन दर क्षणाला वाढत चाललेले दिसते. यात त्याच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कमेंट्स आहेत. दरम्यान, वर्कफ्रंटवर, शाहिद सध्या 'फर्जी'च्या यशाने वावरत आहे. या शोचे दिग्दर्शन राज आणि डीके या प्रसिद्ध दिग्दर्शक जोडीने केले आहे. या मालिकेत विजय सेतुपती, के के मेनन, राशि खन्ना, अमोल पालेकर, रेजिना कॅसांड्रा आणि भुवन अरोरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

शाहिद कपूर

या मालिकेबद्दल बोलताना शाहिदने याआधी सांगितले की, 'या अ‍ॅमेझॉन ओरिजिनल सीरिजमध्ये फर्जीचा माझ्या हृदयात एक खास कोपरा आहे. म्हणायला गेले तर हे माझे डिजिटल पदार्पण आहे. पण फर्जीचे निर्माता राज आणि डीकेसोबत काम करणे सहज घरात वावरल्यासारखे वाटले. विजय सेतुपती, नानू (अमोलजी), के के मेनन, राशी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना मजा आली. मी साकारत असलेली सनी ही भूमिका साधी नव्हती, तर व्यक्तिरेखा खूपच गुंतागुंतीची होती. त्याची परिस्थिती आणि चांगल्या आयुष्याची लालूच त्याला काही निर्णय घेण्यास भाग पाडते. ज्याचा त्याने विचार केला असेलच असे नाही. त्यामुळे हे एक आव्हानात्मक काम होते.'

हेही वाचा -Shahrukh Khan News : पठाणच्या गाण्यावर साडीत थिरकल्या प्राध्यापिका, शाहरुखने म्हटले 'एज्युकेशनल रॉकस्टार'

ABOUT THE AUTHOR

...view details