मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आगामी अॅक्शन 'थ्रिलर' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहिद हा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच शाहिद आणि पूजा एकत्र दिसणार आहे. सॅल्यूट आणि कायमकुलम कोचुन्नी यासारख्या मल्याळम ब्लॉकबस्टरसाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते रोशन एंड्र्यूज हे या चित्रपटाचे दिग्दर्शित करतील. तसेच शाहिदचा हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी त्यांच्या एका निवेदनात सांगितले आहे. तसेच या चित्रपटाला झी स्टुडिओज आणि रॉय कपूरचे समर्थन असणार आहे. या चित्रपटाची कहाणी अशी आहे की, एका उच्च-प्रोफाइल प्रकरणाचा तपास करणाऱ्या हुशार आणि बंडखोर पोलीस अधिकाऱ्याबद्दल आहे जो या प्रकरणात खोलवर जातो तेव्हा तो फसवणूक आणि विश्वासघाताचा जाळ अडकतो त्यानंतर तो रोमांचकारी आणि धोक्याच्या मार्गावर जातो. अशा अॅक्शन, थ्रिल, ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात काम करण्यास उत्सुक असल्याचे शाहिदने म्हटले आहे.
शाहिद लवकरच येणार प्रेक्षकांना भेटायला : शाहिद म्हणाला, 'झी स्टुडिओज आणि सिद्धार्थ रॉय कपूर, यांच्यासोबत मी याआधी हैदर आणि कमिनेमध्ये काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करणे हा एक विशेषाधिकार आहे. आम्ही खूप दिवसांपासूनचे शेजारी आहोत, त्यानंतर तो हसला, पुढे तो म्हणाला, रोशन अँड्र्यूज हे एक दिग्गज चित्रपट निर्माते आहेत. ज्यांचे मल्याळम फिल्मोग्राफी नेत्रदीपक आहे. 'आम्ही आता बरेच महिने एकत्र घालवले आहेत आणि अशा विलक्षण सिनेमॅटिकसोबत मला काम करायला भेटत आहे, हे माझ्यासाठी फार आनंददायक आहे. 'ही उत्कंठावर्धक, मनोरंजक आणि थरारक कहाणी लोकांसमोर आणण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही,' असे त्याने सांगितले.
चित्रपटाबद्दल बोलतांना अँड्र्यूज :अँड्र्यूज म्हणाले की, या चित्रपटाद्वारे मी बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल. 'मी अविश्वसनीय टीमसह सहयोग करण्यास उत्सुक आहे. 'शाहिद आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत काम करणे हे माझ्यासाठी फार प्रेरणादायी राहिल. ते पुढे म्हणाले 'दिग्दर्शक या नात्याने, प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा एक तल्लीन सिनेमॅटिक अनुभव निर्माण करण्याचे माझे ध्येय आहे. मला विश्वास आहे की या चित्रपटाद्वारे माझे उद्दिष्ट साध्य होईल' असे त्यांनी सांगतिले.