मुंबई - Shaheer and Ruchika Second Baby : टीव्ही इंडस्ट्रीतील अर्जुन म्हणजेच अभिनेता शाहीर शेखनं नवीन वर्षाची सुरुवात एका गुड न्यूज देऊन केली आहे. शाहीर शेख आणि रुचिका कपूर या दोघांनीही आपल्या घरी एका गोंडस मुलीचं स्वागत केलं आहे. शाहीर आणि रुचिका यांचं 2020 साली लग्न झालं. त्यानंतर शाहीर आणि रुचिका 2021 मध्ये पहिल्यांदा पालक झाले. रुचिकानं एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिनं मुलगी अनायाची बहीण कुदरतशी लोकांना ओळख करून दिली आहे.
रुचिका कपूरनं शेअर केला फोटो :शेअर केलेल्या फोटोत दोन मुली दिसत आहेत. चेहरा दिसत नसला तरी, कॅप्शन आणि लोकांच्या अभिनंदनावरून शाहीर शेख दुसऱ्यांदा वडील झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या फोटोनं चाहत्यांना सुरुवातीला गोंधळात टाकलं आहे. रुचिका कपूरच्या कॅप्शननं सर्वांना आनंदी केलं आहे. फोटोत रुचिका आणि शाहीरच्या दोन्ही मुली एकत्र दिसत आहेत. या जोडप्याच्या मुली बेडवर खेळताना दिसत आहेत. रुचिकानं पोस्टद्वारे तिच्या दुसऱ्या मुलीचं नाव कुदरत असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. दरम्यान या जोडप्याला टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून खूप शुभेच्छा मिळत आहेत.