महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Jawan Prevue : 'जवान' या चित्रपटातील शाहरुखचा हा लूक 'अपरिचित' चित्रपटाची कॉपी ठरला, प्रीव्हयूवरून ट्विटरवर उडाली खळबळ... - प्रीव्हयूची सर्वत्र चर्चा

शाहरुख खानच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट जवानच्या प्रीव्हयूने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. जवानाच्या प्रीव्हयूची सर्वत्र चर्चा होत आहे, तर या चित्रपटाच्या प्रीव्हयूमध्ये दिसणारे काही सीन्स कॉपी असल्याचे सांगितले जात आहे.

Jawan Prevue
जवान प्रीव्हयू

By

Published : Jul 10, 2023, 2:29 PM IST

मुंबई : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपटाच्या प्रीव्हयूमुळे आता सोशल मीडियावर खळबळी उडाली आहे. सर्वत्र जवान या चित्रपटाबद्दल चर्चा होत आहे. या चित्रपटाचा प्रीव्हयू रिलीज झाल्यानंतर काही प्रेक्षक या चित्रपटाला आताच ब्लॉकबस्टर घोषित करत आहे. तर काहीजण या चित्रपटाच्या काही सीन्स कॉपी असल्याचे सांगत आहे. अ‍ॅक्शन-थ्रिलर 'जवान' या चित्रपटाचे १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता प्रीव्हयू प्रदर्शित झाला. या चित्रपटात नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ ​​अ‍ॅटली दिग्दर्शित जवान या चित्रपटाच्या प्रीव्हयूने प्रेक्षकांना हादरवून सोडले आहे. शाहरुख अशा अवतारात पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर दिसला आहे.

अपरिचित चित्रपट : प्रीव्हयूमध्ये शाहरुखचे अनेक लूक समोर आले आहेत, शाहरुखने कॉपी केलेला लूक हा साऊथ चित्रपट अपरिचितमधील आहे. साऊथ सुपरस्टार चियान विक्रम स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट अपरिचितमधून त्याने हा लूक कॉपी केला असून या लूकमध्ये तो फार भयानक दिसत आहे. दुसरीकडे, शाहरुखचे चाहते या प्रीव्हयूमुळे फार आनंदी आहे.

अपरिचित या चित्रपटामधील मुखवट्याचे लूक :दरम्यान , या चित्रपटातून प्रकट झालेला शाहरुख खानचा मुखवटा २००५मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रम स्टारर आणि शंकरच्या दिग्दर्शित अपरिचित चित्रपटासारखा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या लूकमध्ये शाहरुख खान हा विक्रम सारखा दिसत आहे, असे देखील म्हटले जात आहे. 'जवान' हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

प्रीव्हयू व्हिडिओ कसा आहे? : शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटाचा प्रीव्हयू पाहून तुमचे तोंड उघडे राहतील हे नक्की. या प्रीव्हयूमधील प्रत्येक दृश्य फार जबदस्त आहे. अ‍ॅक्शनने भरलेल्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला, शाहरुख एक मजेदार संवादात बोलतो - मी कोण आहे, कोन नाही, माहित नाही मी माझ्या आईला दिलेले वचन आहे की मी पूर्ण आहे की अपूर्ण, मी चांगला आहे की वाईट? मी पुण्य आहे की पाप? हे स्वतःला विचारा. कारण मी पण तुम्हीच आहे, असे चित्रपटाच्या प्रीव्हयूमध्ये आहे.

प्रीव्हयूमध्ये सर्व स्टार्सची झलक :अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि उत्कट ड्रामाने भरलेल्या प्रीव्हयूमध्ये सर्व स्टार्सची झलक दाखवण्यात आली आहे. सर्वात आश्चर्यकारक म्हणजे दीपिका पदुकोणची एन्ट्री. निर्मात्यांनी तिची कास्टिंग आजवर गुप्त ठेवली होती, या चित्रपटात दीपिकाची छोटी पण महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. प्रीव्हयूमध्ये दीपिकाची एक छोटीशी झलक दिलेली आहे ज्यामध्ये ती पावसात साडी नेसून मारहाण करत आहे. नयनताराची बॉस लेडी स्वॅगमध्ये दिसत आहे. झलक इतकी दमदार की आहे, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणार हे नक्की आहे.

हेही वाचा :

  1. Jawan Preview OUT: जवानचा प्रीव्ह्यू हिंदीमध्ये रिलीज, शाहरुख खानने आपल्या अभिनयाने आणि अवताराने केला धमाका...
  2. Deepveer : रणवीर सिंगने दीपिका पदुकोणसोबत फोटो शेअर करून घटस्फोटाच्या अफवांना लावले पूर्णविराम....
  3. 'OMG 2' teaser : 'ओह माय गॉड २' ची प्रतिक्षा संपली... अक्षय कुमारने जाहीर केली तारीख

ABOUT THE AUTHOR

...view details