महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Jawan surpasses Rs 1100 crore mark : 'जवान'नं 30 दिवसांत जागतिक बॉक्स ऑफिसवर पार केला 1100 कोटींचा आकडा

Jawan surpasses Rs 1100 crore mark : अभिनेता शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट रिलीज होऊन 30 दिवस उलटूनही बॉक्स ऑफिसवर आपले अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटानं जागतिक स्तरावर 1100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, असे निर्मात्यांनी शुक्रवारी सांगितले.

Jawan surpasses Rs 1100 crore mark
जवान जागतिक बॉक्स ऑफिस कमाई

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 4:08 PM IST

मुंबई- Jawan surpasses Rs 1100 crore mark : सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1103.27 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे, असे निर्मात्यांनी सांगितलंय. रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने शुक्रवारी संध्याकाळी या चित्रपटाच्या कमाईचा नवा आकडा मायक्रोब्लॉगिंग साइट X ( ट्विटर ) वर शेअर केला

'जवान' नवे विक्रम बनवत आहे आणि बॉक्स ऑफिसवर दररोज रेकॉर्ड तोडत आहे', असं म्हणत या पोस्टमध्ये चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनचे प्रदर्शन करणारं पोस्टर शेअर केलंय. एटली कुमार दिग्दर्शित 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये जगभरात प्रदर्शित झाला होता. एका प्रसिद्धीपत्रकात निर्मात्यांनी सांगितलं की, 'जवान हा जागतिक बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींचा गल्ला पार करणारा भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.'

'यामध्ये भारतातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 733.37 कोटी रुपये आहे आणि परदेशातील बॉक्स ऑफिस कलेक्शन 369.90 कोटी इतकं आहे', असं निर्मात्यांनी पत्रकात म्हटलंय. 'जवान' चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आपले पाय मजबूतपणे रोवले आहेत. हिंदी पट्ट्यातून 'जवान' चित्रपटाचे निव्वळ कलेक्शन 560.03 कोटी रुपये झाले आहे. इतर भाषेतील डब्सचे कलेक्शन रुपये 59.89 कोटी इतकं आहे. जवान चित्रपटाने भारतात 619.92 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा टप्पा ओलांडला असून अजूनही चांगल्या संख्येनं प्रेक्षकांचा थिएटरकडे येण्याचा सिलसिला जारी आहे.

'जवान' या चित्रपटाची कथा समाजातील चुका सुधारण्यासाठी सज्ज झालेल्या माणसाच्या भावनिक प्रवासाची आहे. यात शाहरुख खाननं विक्रम राठौर आणि त्याचा मुलगा आझाद अशी दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांच्यासोबत नयनतारा आणि विजय सेतुपती देखील आहेत. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा अशी नावाजलेल्या कालाकारांची मांदियाळी यात पाहायला मिळते. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती गौरी खाननं गौरव वर्मासह केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details