महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rocky Rani ki Prem kahani : करण जोहरच्या 'रॉकी रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार बॉलिवूडचे 'हे' कलाकार - सारा अली खान

करण जोहरच्या आगामी चित्रपट 'रॉकी रानी की प्रेम कहानी'मध्ये अनेक कलाकार कॅमिओमध्ये दिसणार आहेत, ज्यामध्ये शाहरुख खानचे नावही समोर येत आहे आणि आता करण जोहरनेही यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Rocky Rani ki Prem kahani
रॉकी रानी की प्रेम कहानी

By

Published : Jul 5, 2023, 5:06 PM IST

मुंबई : बॉलिवूडचा टॉप फिल्ममेकर करण जोहरने बऱ्याच दिवसांनी एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे नाव 'रॉकी रानी की प्रेम कहानी' आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही हिट जोडी पुन्हा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. ४ जुलै रोजी करण जोहरने चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. काही प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला तर काही प्रेक्षकांनी याला घराणेशाहीचा चित्रपट म्हटले आहे.

अनन्या पांडे दिसणार 'रॉकी रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात : दरम्यान करण जोहरच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनन्या पांडे आणि रणवीर सिंग एका गाण्यात डान्स करताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्यचा एक धक्का बसला आहे. आता केवळ अनन्या पांडेच नाही तर इतर स्टार्सही या चित्रपटात कॅमिओ करताना पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता शाहरुख खानही रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

या गाण्यात वरुण-सारा-जान्हवी दिसणार आहेत : वरुण धवन, सारा अली खान आणि जान्हवी कपूर या चित्रपटातील 'झुमका' गाण्यात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेलरमधील एका गाण्यात अनन्या पांडेची झलक आधीच दिसली असून या गाण्यात वरुण, सारा आणि जान्हवी देखील पाहायला मिळतील असे बोलले जात आहे.

शाहरुख खान कॅमिओ? : दरम्यान, ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, करण जोहर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी जोडला गेला होता. तेव्हा यावेळी एका चाहत्याने विचारले होते की शाहरुख खान देखील या चित्रपटात येणार का? ज्यावर करण जोहरने नकारार्थी उत्तर दिले आणि म्हटले की शाहरुख खानचा या चित्रपटसाठी आमच्यासोबत आशीर्वाद राहणार. हा चित्रपट येत्या २८ जुलैला रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार आतुरतेने पाहत आहे. या चित्रपटच्या टिझरला फार प्रेक्षकांनी पसंत केले आहे. हा चित्रपट भव्य बजेटचा असून या चित्रपटात आलिया आणि रणवीर व्यतिरिक्त धर्मेंद्र, प्रीति जिंटा, जया बच्चन, शबाना आझमी, अर्जुन बिजलानी, रोनित रॉय असे अनेक कलाकर दिसणार आहे. चित्रपट फार मनोरंजक असणार आहे.

हेही वाचा :

  1. Bawaal Teaser OUT : 'बवाल'चा टीझर रिलीज, वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा चित्रपट 'या' तारखेला रिलीज होणार
  2. Kriti Sanon launches production house : क्रिती सेनॉनच्या प्रोडक्शन हाऊसचा संबंध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत
  3. Tejas gets release date : कंगना रणौतच्या तेजसची रिलीजची तारीख जाहीर, तेजसची गणपथशी बॉक्स ऑफिसवर टक्कर

ABOUT THE AUTHOR

...view details