महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शाहरुखच्या वाढदिवशी 'पठाण'चा बहुप्रतीक्षित टिझर रिलीज - Shah Rukh Khan 57th birthday

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. शाहरुख खानच्या सिनेमाची प्रतीक्षा करत असलेल्या चाहत्यांसाठी हा टिझर एक सरप्राईज आहे. यात शाहरुख वेगळ्या आणि आक्रमक भूमिकेत दिसत आहे. दमदार अॅक्शन, जबरदस्त स्टंट आणि डोळ्यांची पारणे फेडणारी दृष्ये टिझरमध्ये दिसत आहेत.

शाहरुखच्या वाढदिवशी 'पठाण'चा बहुप्रतीक्षित टिझर रिलीज
शाहरुखच्या वाढदिवशी 'पठाण'चा बहुप्रतीक्षित टिझर रिलीज

By

Published : Nov 2, 2022, 11:28 AM IST

मुंबई - यशराज फिल्म्सने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. किंग खानच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्य त्याच्या चाहत्यांना मिळालेली गेल्या चार वर्षापासूनची ही सर्वात मोठी भेट आहे.

यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर टिझर रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''अतिशय खास दिवसासाठी एक खास सरप्राईज! पठाण टिझर आला आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर फक्त YRF50 सह पठाण साजरा करा. हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे.''

शाहरुख खानच्या सिनेमाची प्रतीक्षा करत असलेल्या चाहत्यांसाठी हा टिझर एक सरप्राईज आहे. यात शाहरुख वेगळ्या आणि आक्रमक भूमिकेत दिसत आहे. दमदार अॅक्शन, जबरदस्त स्टंट आणि डोळ्यांची पारणे फेडणारी दृष्ये टिझरमध्ये दिसत आहेत. टिझरमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचीही झलक पाहायला मिळत आहे. ओम शांती ओम, हॅपी न्यू इयर आणि चेन्नई एक्सप्रेस नंतर पठाण हा दीपिका आणि शाहरुख खानचा चौथा ऑन-स्क्रीन सहयोग आहे.

पठाण 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -Actor Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खानने चाहत्यांना केले खुश, मन्नत बाहेर येत दाखविली सिनेमातील 'ती' अॅक्शन

ABOUT THE AUTHOR

...view details