मुंबई - Dunki movie : शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'डंकी'मुळं चर्चेत आहे. 30 वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करणारा किंग खान हिंदी चित्रपटसृष्टीत आता देखील हिट चित्रपट देत आहे. शाहरुखनं अनेक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान शाहरुख खानबाबत एक बातमी समोर आली आहे. 'पठाण' आणि 'जवान' रुपेरी पडद्यावर हिट झाल्यानंतर किंग खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटामधील पहिलं गाणं 'लूट पुट गया' रिलीज होणार आहे. याआधी शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या एका सीनबाबत मोठा खुलासा झाला आहे. 'डंकी' चित्रपटातील अडीच मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी शाहरुख खानला 25 वेळा रिहर्सल करावी लागली. या सीनसाठी किंग खानला खूप वेळ लागला होता.
शाहरुखनं सीनसाठी 25 वेळा केली रिहर्सल : 'डंकी'मधील या सीनसाठी काम करणारा अभिनेता अजय कुमारनं याबद्दल खुलासा केला आहे. या चित्रपटातील अजयच्या भूमिकेचे नाव वांगी पुरप्पू वेंकट कुप्पू आहे. त्यानं यापूर्वी राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' चित्रपटातही काम केले आहे. 'डंकी' चित्रपटातील एका दृश्यात तो शाहरुख आणि त्याच्या चार मित्रांसोबत आहे. अजय सांगितले की, सकाळी 10 वाजता सेटवर पोहोचल्यानंतर तो शाहरुख खानची वाट पाहू लागला आणि काही वेळानं किंग खानही सेटवर पोहोचला. यानंतर 6 तास शूटिंग सुरू राहिली. त्याचवेळी, सेटवर ब्रेकच्या वेळी शाहरुख खान बसून त्याच्या सीनची रिहर्सल करत असे. अजयनं पुढं सांगितल, चित्रपटात त्याच्यासोबत केलेल्या एका सीनसाठी शाहरुखनं 25 वेळा रिहर्सल केली आणि हा सीन अनेक प्रकारे शूट करण्यात आला. शाहरुख वेगवेगळ्या पद्धतीनं हा सीन शूट करायचा आणि राजकुमार हिराणीला पाठवायचा. किंग खान त्याच्या चित्रपटांसाठी खूप मेहनत घेतो असं त्यानं पुढं म्हटलं.