हैदराबाद- साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरहिट अभिनेत्री नयनतारा आज (9 जून) चेन्नईमध्ये चित्रपट निर्माता विघ्नेश शिवनसोबत लग्न करणार आहे. हा विवाह महाबलीपुरम रिसॉर्टमध्ये होणार आहे. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. चित्रपट जगतातील दिग्गज स्टार्सही या लग्नात हजेरी लावणार असून त्यात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचेही नाव समोर येत आहे. या जोडप्याने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनाही लग्नाचे वैयक्तिक आमंत्रण दिले आहे. या जोडप्याने लग्नाशी संबंधित पाहुणे आणि विधींशी संबंधित कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनतारा आणि विघ्नेश शिवन महाबलीपुरममधील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत. रिसॉर्टमध्ये 129 खोल्या आहेत. संपूर्ण वीकेंडसाठी या रिसॉर्टचे बुकिंग करण्यात आले आहे. या रिसॉर्टमध्ये सिनेतारकाचे लग्नाचे रिसेप्शनही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नयनतारा आणि विघ्नेशला आधी डेस्टिनेशन वेडिंग करायचे होते, पण प्लॅन बदलून दोघांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता हे जोडपे तामिळनाडूतील महाबलीपुरम येथील शेरेटन ग्रँड रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत.