मुंबई - शाहरुख खानचा आगामी जवान आणि डंकी हे दोन बहुप्रतीक्षित चित्रपट मानले जातात. डंकीनंतर शाहरुख काय करणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. त्याचे उत्तर आता समोर आले असून तो त्याची लाडकी लेक सुहाना खानसोबत एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि सिद्धार्थ आनंदच्या मार्फ्लिक्स पिक्चर्सद्वारे निर्मित हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.
अगदी लेटेस्ट अपडेटमध्ये, असे कळतंय की हा चित्रपट सुजॉय घोष दिग्दर्शित करणार आहे. कहानी, कहानी २ आणि बदला यासारख्या चित्रपटांसाठी दिग्दर्शक सुजॉय घोष ओळखला जातो. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू अभिनीत बदला या चित्रपटात शाहरुख खान आणि सुजॉय घोष यांनी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून एकत्र काम केले होते.
या आगामी चित्रपटासाठी टीम आता पुन्हा एकत्र येणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. याहून अधिकचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. सुजॉय देखील दिग्दर्शक म्हणून नवा आशयाचा सिनेमा बनवण्या उत्सुक असल्याचे या चित्रपटाच्या संबंधित सूत्राने सांगितले.
'सिद्धार्थ आनंद अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. नव्या चित्रपटासाठी मोठे अॅक्शन ब्लॉक्स तयार करण्यासाठी शाहरुख खान सिद्धर्तसोबत काम करत आहे. सर्वोत्तम संसाधनांचा वापर करून एक अतुलनीय सिनेमॅटिक अनुभव तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे,' असे आतल्या गोटातील एका व्यक्तीने सांगितले. झोया अख्तर दिग्दर्शित तिचा डिजिटल डेब्यू असलेला द आर्चीजचे काम पूर्ण केल्यानंतर, सुहाना खान अनटाइटल्ड अॅक्शन थ्रिलरमधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
या सुजॉय घोष फ्लिकमधील शाहरुख खानचे पात्र डिअर जिंदगीच्या धर्तीवर असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे. रेड चिलीजच्या बाग धारकांना आपल्या आगामी चित्रपटाचे स्वरुप कसे असेल याची कल्पना यातून दिली जाणार आहे.