मुंबई : Dunki Movie : अभिनेता शाहरुख खान, तापसी पन्नू, अनिल ग्रोव्हर , विक्की कौशल, बोमन इराणी आणि विक्रम कोचर स्टारर 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलं आहे. पहिल्यांदाच राजकुमार हिराणी आणि शाहरुख खाननं या चित्रपटाद्वारे एकत्र काम केलं आहे. राजकुमार हिराणी यांनी आजपर्यंत त्यांच्या कारकिर्दीत एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही, मात्र यावेळी तो आपला विक्रम कायम राखताना दिसत नाही. या चित्रपटामधील दृश्ये अतिशय बालिश असल्याचं काही प्रेक्षक म्हणत आहे. राजकुमार हिराणी यांनी प्रेक्षकांची निराशा केली आहे, असं सध्या दिसत आहे.
'डंकी'चं एकूण कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'डंकी'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी गुरुवार देशांतर्गत 29.2 कोटीची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजचे शुक्रवारी या चित्रपटानं 20.12 कोटीचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी शनिवारी 'डंकी'नं 25.5 कोटीची बॉक्स ऑफिसवर कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 74.82 झालं आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या चौथ्या दिवसात आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट 1.58 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 76.4 होईल. ख्रिसमसच्या वीकेंडला 'डंकी'च्या कलेक्शनमध्ये मोठी झेप घेण्याची निर्मात्यांना अपेक्षा आहे.