मुंबई- अनन्या पांडेची चुलत बहीण अलना पांडेच्या लग्नाची चर्चा अजूनही ताजी आहे आणि लग्नाच्या सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शाहरुख खानचा जोडप्याला प्रेमळ आणि उबदार मिठीत घेऊन आशीर्वाद देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अहान पांडे शाहरुख खान स्टारर 'येस बॉस' या चित्रपटातील लोकप्रिय आय एम द बेस्ट या गाण्यावर थिरकताना जबरदस्त दिसत आहे.
अहान पांडेला त्याच्यासमोर शाहरुखचे गाणे परफॉर्म करताना पाहणे ही एक व्हिज्युअल ट्रीट होती. पाहुण्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, चाहत्यांनी त्यांचा उत्साह व्यक्त करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये तोबा गर्दी केली. अहान पांडे नृत्य सादरीकरणाचा संपूर्ण व्हिडिओ वधू अलना पांडेने तिच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. अनन्या पांडेची चुलत बहिणी अलनाने, डान्स पार्टनर करण मेहतासोबत शाहरुखच्या गाण्यावर परफॉर्म करण्यासोबतच, चंकी पांडेच्या विश्वात्मा चित्रपटातील सात समुंदर पार वर अनन्या पांडेसोबतही डान्स केला. अहानने आय एम दे बेस्ट गाण्यावर सादरीकरण केले, तर पठाण अभिनेता शाहरुख खान प्रेक्षकांमध्ये उभा राहिला आणि हसत जोरदार दाद देत होता. पांढरा शर्ट आणि काळ्या पँटमध्ये अहान सुंदर दिसत होता. दुसरीकडे, शाहरुखने काळ्या रंगाचा कोट आणि पांढरा शर्ट असलेली पँट निवडली होती.