महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शाहरुख खानने शेअर केला 'पठाण'मधील दीपिकाचा करारी लूक - पठाणमधील दीपिकाचा लूक

शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक प्रसिध्द करण्यात आला आहे. शाहरुखने त्याच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ पोस्ट करुन दीपिकाच्या चाहत्यांनी ही खूशखबरी कळवली आहे.

'पठाण'मधील दीपिकाचा लूक
'पठाण'मधील दीपिकाचा लूक

By

Published : Jul 25, 2022, 12:39 PM IST

मुंबई - अभिनेता शाहरुखचा महत्त्वकांक्षी चित्रपट पठाण सध्या खूर चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक प्रसिध्द करण्यात आला आहे. शाहरुखने त्याच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ पोस्ट करुन दीपिकाच्या चाहत्यांनी ही खूशखबरी कळवली आहे.

या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण हातात बंदुक ताणलेली दिसत आहे. तिच्या तचेहऱ्यावर करारी भाव दिसत असून या चित्रपटात ती एक आक्रमक भूमिका करीत आहे हे यातून स्पष्ट होते.

''तुम्हाला मारण्यासाठी तिला गोळीची गरज नाही. दीपिकाचा 'पठाण'मधील लूक. 'पठाण' यशराज फिल्मसचा ५० वा चित्रपट साजरा करीत आहे. २५ जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होईल. हिंदी, तमिळ आणि तेलुगु या भाषेत हा चित्रपट रिलीज होईल.'', असे शाहरुखने पोस्टमध्ये लिहिलंय.

हेही वाचा -Breaking : अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि तिचे पती विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details