मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या जगभर चर्चेत आहे. शाहरुख खानने नुकतेच सौदी अरेबियामध्ये 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, त्यानंतर तो उमराह करण्यासाठी मक्का येथे पोहोचला होता. येथून पांढर्या चादरीतील त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शाहरुख खाननेही चेहऱ्यावर मास्क लावला आहे. शाहरुख खानच्या या फोटोंची सगळीकडे चर्चा होत आहे. उमराहनंतर शाहरुख रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना दिसला.
फॅन्स करत आहेत कमेंट - शाहरुख खानचे मक्केतील हे फोटो पाहून त्याचे फॅन्स आश्चर्यचकित झाले असून ते त्यावर कमेंट करत आहेत. अनेक चाहत्यांनी शाहरुखला या स्टाईलमध्ये कधीच पाहिले नसल्याचे सांगत आहेत. सौदी अरेबियातील एका पत्रकाराने ट्विटद्वारे या बातमीला दुजोरा दिला आहे की शाहरुख खरोखरच मक्काला पोहोचला आहे. येथे त्याचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.