मुंबई - shah rukh khan family struggles : चित्रपटसृष्टीला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या सुपरस्टार शाहरुख खाननं त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मनमोकळेपणाने चर्चा केली. शाहरुख खान प्रत्येक इव्हेंट आणि पार्ट्यांना हजेरी लावतो पण त्यानं गेल्या पाच वर्षांत प्रमोशनल कार्यक्रम वगळता एकही मीडिया इंटरव्ह्यू दिलेला नाही. एका मुलाखतीदरम्यान शाहरुखनं कुटुंब आणि त्यांच्या आयुष्यातील समस्यांबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं. यादरम्यान बोलताना शाहरुख खाननं गेल्या काही वर्षात आपल्या कुटुंबावर आलेल्या कठीण प्रसंगांबद्दल म्हटलं की, 'गेली 4-5 वर्षे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी थोडी कठीण होती. माझे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले होते, त्यानंतर लोक म्हणत होते की माझे करिअर संपले.''
किंग खान सांगितला वाईट प्रसंग : यानंतर किंग खाननं पुढं म्हटलं, ''वैयक्तिक स्तरावर काही त्रासदायक गोष्टी देखील घडल्या, ज्यातून मी 'शांत राहाणे आणि सन्मानानं कठोर परिश्रम करणे' या गोष्टी करायला शिकलो. 2021 मध्ये कथित ड्रग्स प्रकरणात आर्यनच्या अटकेचा संदर्भ देत, शाहरुखनं सांगितलं की, ''अचानक कुठूनही कोणीही तुमच्या आयुष्यात येऊन हल्ला करू शकतो, पण यावेळेत तुम्ही आशावादी, आनंदी, प्रामाणिक असले पाहिजे आणि तुम्ही जे काही करत आहात ते सुरू ठेवा आणि हे एक वाईट कथानक आहे, असं समजावं. कारण मला कुणीतरी सांगितलं होतं की ''आयुष्य सुद्धा चित्रपटांप्रमाणे असते. कधी दु:ख तर कधी सुख. जर आपण दु:खात असेल तर असं समजायचं की हा कहाणीचा शेवट नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.''