मुंबई - Shah rukh khan :अभिनेता शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'डंकी'च्या रिलीजपूर्वी किंग खान दुबईमध्ये एका भव्य कार्यक्रमात सहभागी झाला होता. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. सध्या शाहरुख हा 'डंकी' चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटामध्ये किंग खान व्यतिरिक्त तापसी पन्नू ,विकी कौशल, सतीश शहा, बोमन इराणी , विक्रम कोचर,अनिल ग्रोव्हर आणि इतर कलाकार दिसणार आहेत. जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहेत.
'डंकी' चित्रपटाचं प्रमोशन : 'डंकी' चित्रपटाचं प्रमोशन करत असताना शाहरुख स्टेजवर पोहोचताच त्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'डंकी'च्या प्रमोशनच्या कार्यक्रमात किंग खाननं 'झूम जो पठान' या गाण्यावर डान्स केला. आपल्या चित्रपटाविषयी बोलताना किंग खाननं म्हटलं , 'मी 'जवान' बनवला, मग मला वाटले की हा मुला-मुलींसाठी मी चित्रपट बनवला आहे. मी माझ्यासाठी काही बनवले नाही. मग मी 'डंकी' बनवला. हा माझा चित्रपट आहे, जो माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. माझ्या वर्षाची सुरुवात 'पठाण'नं झाली आणि मला 'डंकी' चित्रपटाद्वारे वर्ष संपवायचं आहे.